CCTV Theft in Swami Samarth Temple esakal
नाशिक

Nashik Crime News : नांदूर शिंगोटे येथे स्वामी समर्थ मंदिरात चोरी!

Nashik News : नांदूर शिंगोटे येथे लहान-मोठ्या चोऱ्यांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नांदूर शिंगोटे येथे लहान-मोठ्या चोऱ्यांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली असून कधी डिझेल चोरी, कधी शेतकऱ्यांच्या केबल चोरी, शेती पंप चोरी तर आता चक्क चोरट्यांनी आपले लक्ष आता मंदिरे बनविली आहे. चास रस्त्यालगत असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये लागून असलेल्या रूमचा टाळे तोडून चोरट्यांनी चक्क त्या ठिकाणी सीसीटीव्ही युनिटचे डीव्हीआर, हार्ड डिक्स व राऊटर असा पंधरा ते वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल रात्रीच्या सुमारास चोरून नेला. (Nashik Crime News)

हा सर्व प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला म्हणजेच बुधवारी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी ही चोरी झाली असावी. या अगोदरही या ठिकाणी दानपेटी फोडल्याच्या घटना घडलेल्या आहे.

मात्र आता चक्क चोरट्याने या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही युनिट ची चोरी केल्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये कुठल्याही प्रकारची रेकॉर्डिंग आता राहिले नाही. (latest marathi news)

तेव्हा या परिसरामधील भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत नांदुर-शिंगोटे पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून पुढील तपास नांदुर-शिंगोटे पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT