Accused cutting sandalwood tree and cut sandalwood tree at Udan Garden esakal
नाशिक

Nashik Crime : ओझर टाऊनशिप उड्डाण गार्डन मधील चंदनाच्या झाडाची चोरी; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने आरोपीस पकडले रंगेहाथ

Crime News : एचएएल विभागाच्या सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे चंदनाचे झाड कापताना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले, तर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

सकाळ वृत्तसेवा

ओझर : टाऊनशिप एचएएल वसाहतीतील भाजी मार्केट ते एचएएल हॉस्पिटल दरम्यान असलेल्या उड्डाण गार्डन येथील चंदनाच्या झाडाची कत्तल करून चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैंकी एकास एचएएल विभागाच्या सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे चंदनाचे झाड कापताना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले, तर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

टाऊनशिप मधील उडाण गार्डन मधील चंदनाची झाडे होती. रात्रीच्या वेळी तिघेजण हे झाड कापण्यासाठी आले व त्यांनी एक झाड बुडापासून कापण्यास सुरवात केली. सुरक्षा रक्षक गस्त घालत असतांना ही बाब त्याच्या लक्षात आली. त्यांनी चंदनाचे झाड कापतांना एकास रंगेहाथ पकडले.

तर त्यातील त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले असून चंदन चोरणाऱ्या तिघांपैंकी रंगेहाथ पकडलेला आरोपी हा जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील आहे. त्याचे नांव जाकिर अहमद रहेमान खान असे असून त्यास ओझर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून ओझर पोलीस फरार झालेल्या दोघांचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

बाबो...! 'हा' अभिनेता चक्क विकतोय सिलेंडर, १० लाख रुपयांना एक सिलेंडर आणि...

Latest Marathi News Live Update : धुळ्यात गॅस टंचाईमुळे लाकडांची विक्री वाढली

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

SCROLL FOR NEXT