unknown thief esakal
नाशिक

Nashik Crime : ओझरच्या दुर्गामाता मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

Latest Crime News : आज्ञात चोरट्यांनी गाभाऱ्यातील दानपेटी फोडून वीस पंचवीस हजाराचे गुप्तदान वर डल्ला मारला

सकाळ वृत्तसेवा

ओझर : येथील मुंबई आग्रा महामार्गावरील पश्चिम बाजूला असलेल्या ग्रामदैवत दुर्गा माता मंदिराच्या खिडकीची जाळी तोडून आज्ञात चोरट्यांनी गाभाऱ्यातील दानपेटी फोडून वीस पंचवीस हजाराचे गुप्तदान वर डल्ला मारला असल्याची घटना ओझर येथे घडली दरम्यान दोन महिन्यापूर्वी १९ जुलै रोजी गांवातील कासार समाजाच्या कालिका देवी मातेच्या गाभाऱ्यातील दान पेटीवर चोरट्यांनी डल्ला मारून गुप्तदान पळवले होते. (Thieves raid donation box in Ozar Durga Mata temple )

काल दिनाक २१ रोजी रात्री १.४५ ते २.३० वाजेच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गालगत सर्व्हिस रोडवर असलेल्या दुर्गा माता मंदीरातील स्लायडिंग खिडकीची जाळी तोडुन मंदिरात प्रवेश करून आज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील स्टील तसेच मंदिराच्या दोन्ही बाजुस ठेवलेल्या दानपेटीचे कुलुप तोडुन, मंदिरात भक्तांनी केलेले दानपेटीतील गुप्तदान २० ते २५ हजार रुपये अंदाजित रक्कम त्यात ५रू, १०रू, २०रू,५०रू, १००रू, २००रू, ५००रू, अशा वर्णनाच्या चलनी नोटा व नाणी असे.

वीस ते पंचविस हजार रोख रक्कम चोरी करून नेले अशी तक्रार मंदिराची देखभाल करणारे शाम वंसतराव शिंदे राहाणार अत्तारलेन जय मल्हार चौक ओझर यांनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिनकर वाघेरे करत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT