That incident Well esakal
नाशिक

Nashik Crime News : खळबळजनक! सिन्नर येथे तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रकार उघड; संशयित गजाआड

Latest Crime News : देव बलवत्तर म्हणून हे तिन्ही मुले वाचल्याने झालेल्या सर्व घटनेचा प्रकार समोर आला आहे. तसेच घटनेची सुपारी देणारा संशयित अमोल रामनाथ लांडगे याला गजाआड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील तीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून जीवे ठार मारण्याचा प्रकार घडल्याने शिवाय नात्यांमधीलच एकाने हे कृत्य केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. देव बलवत्तर म्हणून हे तिन्ही मुले वाचल्याने झालेल्या सर्व घटनेचा प्रकार समोर आला आहे. तसेच घटनेची सुपारी देणारा संशयित अमोल रामनाथ लांडगे याला  गजाआड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेतील वरद संतोष घुगे (१३), अथर्व संतोष घुगे (९) आणि त्यांचा मित्र आदित्य सानप (१३) ही तिनही मुले वाचली आहेत. बुधवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वरद, अथर्व आणि आदित्य ही तिन मुले अंगणात खेळत असताना अमोल लांडगे याने जवळ असलेल्या विहीरीजवळ उभ्या असलेल्या दोघांकडून कासव घेऊन येण्याचे वरद व अथर्व यांना सांगितले.

घुगे भावंडे विहीरीकडे गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आदित्य सानप हा ही तेथे पोहचला. तेथे उभ्या असलेल्या विक्रम नारायण माळी आणि साईनाथ शिवाजी ठमके या दोघांनी या मुलांना विहीरीत कासव असल्याचे सांगितले. कासव बघण्यासाठी मुले विहिरीत पाहत असताना यावेळी माळी व ठमके यांनी या तिन्ही मुलांना विहिरीत लोटून दिले व तिथून पळ काढला.मात्र विहीरीत विद्युतपंप, पाईप, केबल यांना बांधलेल्या दोरखंडाचे जाळे असल्याने वरद घुगे याच्या हातात एक दोरखंड लागला, त्यामुळे दोरखंडाला धरुन स्वतः चा जीव वाचवत इतर दोघांनाही त्याने विहीरीबाहेर काढले.

विहिरीत पडल्यानंतर जीव कसाबसा वाचवून बाहेर आल्यावर मुले घरी आल्यावर अमोल लांडगे यांना फोन करून झालेला सर्व प्रकार सांगितला. यावर अमोल लांडगे यांनी हा प्रकार कोणालाही घरी सांगू नका, असे धमकावून सांगितल्यानंतर मुले रात्री झोपी गेली. संतोष व दिपाली घुगे यांचे महा-ई-सेवा केंद्र शिंदे येथे असल्याने ते रात्री घरी आल्यानंतर मुले झोपी गेली होती. (latest marathi news)

शेजारी राहणाऱ्या आदित्य सानप यांनी आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला होता. त्याच्या आईने घुगे कुटुंबियांना घरी आल्यानंतर हे सर्व घटना सांगितल्यानंतर यावर प्रकाश पडला. हा सर्व प्रकार अमोल लांडगे यांना घुगे कुटुंबियांनी विचारल्यावर विहिरीत लोटणारे दोघेजण गावातून फरार झाल्याचे समजले.

गुरुवारी सकाळी घुगे आणि सानप कुटूंबाने एकत्र येऊन पोलिस पाटील सागर मुठाळ यांच्याकडे संबंधित घटना सिन्नर पोलिसांपर्यंत पोहचवली. यासंदर्भात मुलांची आई दिपाली संतोष घुगे (३२) रा. वडगाव-पिंगळा, ता. सिन्नर हिने दिलेल्या फिर्यादीवरुन अमोल रामनाथ लांडगे याच्याविरोधात कट रचून मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, संजय गोसावी, अमोल शिंदे करत आहेत. दोन संशयित गुन्हेगारांसाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असून. लवकरात लवकर या सर्व घटनेचा तपास करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam: ''बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय'' शरद पवारांचे शब्द; त्यांनाही 'मातोश्री'वर रोखलं होतं!

आईशिवाय वाढलेली तू... सायलीचा अपमान होताच भडकणार प्रतिमा; प्रियाच्या कानशिलात लगावणार, आजच्या भागात काय घडणार?

Mystery of Umoja Village : 'या' गावात पुरुषांना आहे प्रवेशबंदी, तरीही महिला होतात गर्भवती; काय आहे गूढ जाणून घ्या....

Stock Market Closing: शेअर बाजाराने घेतला यू-टर्न; सेन्सेक्स निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?

Mumbai Metro Aqua Line: मुंबईमध्ये धावत्या भूमिगत मेट्रोत उडाल्या ठिणग्या; प्रवाशांत घबराट अन्...

SCROLL FOR NEXT