Suspect with marijuana seized in police operation. Officers and staff of the neighboring police team. esakal
नाशिक

Nashik Crime News : पिकअप जीपमधून गांजाची वाहतूक; कथित साधूसह तिघांना अटक

Nashik Crime News : पिकअप जीप मधून वाहतूक करण्यात येणारा ८६ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा पोलिसांनी जप्त करत चिंचोली गुरव (ता.संगमनेर) येथील कथित साधुसह दोघांना अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

वावी : सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे शिवारात चासखिंडीमध्ये वावी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पिकअप जीप मधून वाहतूक करण्यात येणारा ८६ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा पोलिसांनी जप्त करत चिंचोली गुरव (ता.संगमनेर) येथील कथित साधुसह दोघांना अटक करण्यात आली. (Transportation of ganja in pickup jeep)

चास - नांदूरशिंगोटे मार्गे गांजाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नांदूर शिंगोटे शिवारात चासखिंडीमध्ये नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यावेळी रस्त्यापासून आत काही अंतरावर संशयास्पद उभ्या असलेल्या पिकअप (एमएच १७ सीव्ही १५८१) वाहनांची तपासणी केली.

यावेळी वाहनामध्ये पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये गांजा मिळून आला. यावेळी पोलिसांनी तत्काळ वाहनातील कथित साधू योगी पवननाथ बाबा शक्तीनाथ (३९, रा. पुष्कर, राजस्थान, ह.मु. चिंचोली गुरव ता. संगमनेर).

चालक गोरख गोपीनाथ भादेकर (४१, रा.चिंचोली गुरव), शरद रामनाथ शेळके (४३, रा. नांदूरशिंगोटे) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयित यांच्याकडून तीन गाण्यांमध्ये भरलेला चार किलो ३०० ग्रॅम वजन असलेला ८६ हजार रुपये किमतीचा गांजा, दोन मोबाईल, सात लाख रूपये किमतीची पिकअप जप्त केली.

सहाय्यक निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे, हवालदार हेमंत कदम, साहेबराव बलसाने, किरण पवार, महिला पोलिस शिपाई श्री. चव्हाण यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT