Crime Branch team with arrested suspects along with stolen bikes. esakal
नाशिक

Nashik Crime News : चोरीच्या दुचाकींसह त्रिकुटाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Nashik Crime : चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी आलेल्या तिघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माळेगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी आलेल्या तिघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माळेगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्यांचा अन्य एक साथीदार फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. निखिल विजय वाल्हेकर (वय २०), संदीप संजय वाल्हेकर (वय २२, दोघे रा. वेल्हाळे, ता. संगमनेर), ज्ञानेश्वर गणपत शेलुते उर्फ आरुष सोनार (वय २८, रा. छावणी, छत्रपती संभाजीनगर) या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या दुचाकीसह पकडले.

त्यांच्याकडून बजाज पल्सर, हीरो स्प्लेंडर, टीव्हीएस आपाचे अशा तीन दुचाकी जप्त केल्या. पकडलेले तिघे संशयित सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत. पकडलेल्या संशयितांकडून संगमनेर शहर, एमआयडीसी अहमदनगर व चंदननगर, पुणे शहर पोलिस ठाणे, सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाणे येथील चार गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.

आणखी काही गुन्हे उघडकीस येतील, अशी शक्यता आहे. संशयित गेल्या चार महिन्यांपासून सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. तेथून ये-जा करून ते चोऱ्या करायचे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, पोलिस अंमलदार नवनाथ सानप, उदय पाठक, विनोद टिळे, विश्वनाथ काकड यांचे पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT