Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : घरातून लहान मुल पळविण्याचा प्रयत्न! अंबड पोलिसांकडून संशयित महिलेचा शोध सुरू

Nashik News : सिडकोतील विजयनगर परिसरामध्ये घरातील झोळीमधील लहान मूल पळविण्याचा प्रयत्न मुलाच्या आईच्या सतर्कतेमुळे फसला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिडकोतील विजयनगर परिसरामध्ये घरातील झोळीमधील लहान मूल पळविण्याचा प्रयत्न मुलाच्या आईच्या सतर्कतेमुळे फसला. संशयित महिलेविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. (Trying to run away children from home Ambad police are searching for suspect woman)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना बुधवारी (ता. ३) दुपारी साडेबाराला ही घडली आहे. मुलाच्या आईचे घरातील कामकाज आटोपल्यानंतर तिने झोळीमध्ये मुलाला टाकले आणि बाथरुममध्ये गेली. त्याचवेळी झोळीतील मुलाचा रडण्याचा आवाज तिला ऐकू आला. त्यामुळे तिने बाथरूममधून बाहेर धावत आली असता, त्यावेळी ४० ते ४५ वयोगटातील एक जाडजुड महिला हातात झोळीतील मूल घेऊन उभी होती.

पंजाबी सलवार व तोंडावर पांढरा रुमाल बांधलेल्या संशयित महिलेच्या हातातील मुल तिने हिसकावून घेतले. परंतु भितीपोटी तिच्या तोंडातून आवाज निघाला नाही. तर संशयित महिलेनेही लगेच पळ काढला. सदरची बाब तक्रारदार महिलेने संध्याकाळी तिचा पती घरी आल्यानंतर सांगितली. त्यांनी अंबड पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी परिसरात कुठेही सीसीटीव्ही आढळून आले नाही. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित महिलेचा पोलिस शोध घेत आहेत. (latest marathi news)

नागरिकांनी केले आश्चर्य व्यक्त

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्याठिकाणी अरुंद गल्ल्या असून आसपास कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पोलिसांनी आसपासच्या नागरिकांकडे चौकशी केली असता, ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मुलाच्या आईने आरडाओरडा केला असता तरी नागरिकांनी जमा होत संशयित महिलेला पकडले असते असे सांगितले.

परंतु तसे काही झाले नाही. तसेच, तक्रारदार महिलेच्या वर्णनानुसार अशी महिलाही कोणी पाहिली नाही, असे परिसरातील नागरिक व महिलांनी सांगितले. त्याचप्रमाणे अशी घटना घडल्याबद्दलच अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तरीही पोलिस संशयित महिलेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT