Fake Rs 500 notes seized from women arrested from Muktidham area. esakal
नाशिक

Nashik Fake Notes Crime: पुन्हा बनावट नोटांसह दोघींना अटक; गुंडाविरोधी पथकाची मुक्तीधाम परिसरात कारवाई

Crime News : शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fake Notes Crime : नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाम याठिकाणी ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह दोन महिलांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अंबड पोलिसांनी बनावट नोटांसंदर्भात कारवाई केल्याने, शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला की काय, अशी शक्यता व्यक्त होते आहे. (Crime Two arrested again with fake notes)

स्वाती देविदास आहिरे (रा. सदगुरुनगर, दसक-पंचक, नाशिकरोड), पूजा अनिल कहाने (रा. केरू पाटीलनगर, जेलरोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार विजय सूर्यंवंशी यांना मुक्तीधाम परिसरात काही महिला बनावट नोटा घेऊन येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, पथकाचे सहायक निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने मुक्तिधाम परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी संशयित पूजा ही महिला त्याठिकाणी आली असता, तिच्याकडे एक प्लास्टिकची पिशवी होती. जरा वेळाने संशयित स्वाती त्याठिकाणी आली आणि तिने पूजा हिच्याकडून बनावट नोटा असलेली प्लॅस्टिकची पिशवी घेतली.

त्यावेळी दबा धरून असलेल्या महिला पोलीस अंमलदार सूवर्णा गायकवाड यांनी दोघींना अटकाव करीत तिच्याकडून पिशवी घेतली. त्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा होत्या. या नोटा हुबेहुब ५०० रुपयांच्या नोटांसारख्या होत्या. बनावट १० हजारांच्या नोटासह दोघींना पथकाने अटक करून उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. (latest marathi news)

सदरची कारवाई गुन्हेशाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट दोनचे सहायक निरीक्षक सचिन जाधव, गुंडाविरोधी पथकाचे विजय सूर्यंवंशी, डी.के. पवार, राजेश सावकार, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, नितीन गौतम, सूवर्णा गायकवाड, बाळू शेळके, प्रकाश भालेराव, शंकर काळे विलास गांगुर्डे यांच्या पथकाने बजावली.

नोटा आल्या कोठून?

दरम्यान, सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या महिला या गृहिणी असून, अद्यापपर्यंतच्या तपासात त्यांच्याविरोधात कोणतेही गुन्हे आढळून आलेले नाहीत. परंतु त्यांच्याकडे बनावट नोटा कोणाकडून आल्या याबाबत मात्र त्यांच्याकडून कोणतीही माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही.

यामुळे तांत्रिक विश्लेषणानुसार पोलीस तपास करीत आहेत. तर दोन दिवसांपूर्वीच अंबड पोलिसांनी ५०० रुपयांच्या बनावट ३० नोटा जप्त केल्याची कारवाई केली आहे. यामुळे शहरात आणखी बनावट नोटा आल्या असण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! रिझर्व्ह बँकेने ठोठावला 7 लाखांचा दंड; संचालकांच्या संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप भोवलं

हा ट्रेक नव्हता... निसर्गाशी झालेली जिवंत झुंज होती! लोणावळा ते भीमाशंकर ट्रेकचा अनुभव

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Jalgaon ACB Action : 'कॅल्क्युलेटर बाबा'च्या कार्यालयावर धाड! शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना 'भूमिअभिलेख'मधील दोघांना रंगेहाथ पकडले; जळगावातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT