Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : गांजाची कारमधून तस्करी करणारे दोघे जेरबंद; चुंचाळे पोलिसांची कारवाईत 11 किलो गांजा जप्त

Crime News : कार व गांजासह सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मुंबई - आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईंट याठिकाणी वाहनांची तपासणी करताना कारमधून तब्बल ११ किलोच्या गांजाचा तस्करी केली जात असल्याचे निष्पन्न झाल असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. कार व गांजासह सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. ३) पोलीस कोठडी सुनावली आहे. (Nashik Crime Two arrested for smuggling ganja from car Chunchale)

प्रदीप रामनारायण मौर्या (३८, रा. इंदिरानगर पोलीस चौकीसमोर, गणेश चाळ, गोळीबार रोड, खार पूर्व, मुंबई), मोहम्मद सिकंदर अब्दुल गफार शेख (५३, रा. न्यू जे डी एस बिल्डिंग, कोपचर पाडा, बाबानगर, विरार पूर्व, जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा तस्करांची नावे आहेत.

चुंचाळे पोलीस चौकीचे अंमलदार श्रीहरी बिराजदार यांच्या फिर्यादीनुसार, गुन्हेशोध पथकाला अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, मंगळवारी (ता. ३) रात्री अंबड औद्योगिक वसाहतीतील मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईंट याठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरू होती. (latest marathi news)

त्यावेळी संशयित वॅगनार कार (एमएच ०१ इएम ५६५८) आली असता, तपासणीत कारमध्ये ओलसर पानफुल, बिया देठासह गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला. ११.१६८ किलो वजनाचा १ लाख ३४ हजार १६ रुपयांचा गांजा, ५ लाखांची वॅगनार कार, दोन मोबाईल असा ६ लाख ४७ हजार १६ रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक अतूल पाटील हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनाेहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल पाटील हे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT