Two suspects in the deadly attack have been arrested. including the anti-gang squad of the city crime branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : प्राणघातक हल्ल्यातील दोघांना मालेगावातून अटक; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Crime News : गेल्या महिन्यात गांधीनगरमध्ये जुन्या वादातून एकाला शिवीगाळ करीत धारदार हत्याराने वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या महिन्यात गांधीनगरमध्ये जुन्या वादातून एकाला शिवीगाळ करीत धारदार हत्याराने वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे संशयित पसार असताना, शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने त्यांना मालेगावातून शिताफीने अटक केली आहे. (Nashik Crime Two arrested from Malegaon in deadly attack)

गौरव रामादास साटोटे (२४), सौरभ रामदास साटोटे (२१, रा. समतानगर, उपनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. गेल्या १४ मार्च रोजी संशयितांनी सागर राम सदावर्ते यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल होता. मात्र संशयित पसार झाले होते.

या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथक करीत होते. मात्र संशयितांचा कोणताही सुगावा लागत नव्हता. पथकाने तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून संशयितांचा शोध घेतला असता, संशयित हे येसगाव, मालेगाव येथे असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, गुंडाविरोधी पथकाने शनिवारी (ता. १३) रात्री येसगाव गाठून दोघांना शिताफीने जेरबंद केले.

यापकरणी अधिक तपासासाठी दोघांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांच्या पथकाने बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT