Arresting the gold chain thieves and confiscating them from him. Along with the team of Unit One of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : दोघा चैनस्नॅचरच्या मुसक्या आवळल्या; शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

Crime News : संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून मोपेडसह चोरीचे सोने असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गेल्या आठवड्यात शहरातील उच्चभ्रु वसाहत असलेल्या सिरीन मेडोज परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत खेचून नेणाऱ्या दोघा सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून मोपेडसह चोरीचे सोने असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nashik Crime two chain snatchers arrested)

योगेश शंकर लोंढे (रा. खळवाडी, ता. सिन्नर), दत्तू उत्तम धुमाळ (रा. जोशी वाडा, गंगापूर रोड) असे दोघा संशयितांची नावे आहेत. भारती पुरुषोत्तम रावत (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड) या १ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना संशयितांनी मोपेडवरून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यात संशयितांचा शोध घेत असताना, अंमलदार मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांना दोघा संशयितांची खबर मिळाली. त्यानुसार चोपडा लॉन्स परिसरात सापळा रचून निळ्या रंगाच्या मोपेडवरील (एमएच १५ जीएल ०४३५) दोघांना शिताफीने जेरबंद केले. (latest marathi news)

चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीचे सोने त्यांनी काठेगल्लीतील सराफाला विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून १ लाखांच्या सोन्याची लगड व मोपेड असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयितांना तपासाकामी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, गजानन इंगळे, चेतन श्रीवंत, सुगन साबरे, शरद सोनवणे, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, धनंजय शिंदे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड, किरण शिरसाठा यांच्या पथकाने बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT