Mumbai Police seized vehicle with beef.  esakal
नाशिक

Nashik Crime News : 150 किलो मांससह दोघे पोलिसांच्या ताब्यात

Nashik Crime : मुंबई नाका गुन्हे शोध पथकाकडून दीडशे किलो गोवंश मांस जप्त करत अल्पवयीनसह एका संशयितास पथकाने ताब्यात घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मुंबई नाका गुन्हे शोध पथकाकडून दीडशे किलो गोवंश मांस जप्त करत अल्पवयीनसह एका संशयितास पथकाने ताब्यात घेतले आहे. बुधवारी (ता.२१) ही कारवाई करण्यात आली. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पखाल रोड भागात एका वाहनात गोवंश मांस विक्रीस येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रोहिदास सोनार यांना मिळाली. (Nashik Crime marathi news)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की, पोलिस निरीक्षक (गुन्हे) साजिद मन्सुरी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सोनार तसेच समीर शेख, नवनाथ उगले, गणेश बोरनारे सापळा रचून होते. संशयितांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन (क्रमांक एम. एच ४६ एम ७३२१) चा पाठलाग करून पोलिसांनी काही अंतरावरच त्यांना अडविले.

वाहनात १५० किलो गोवंश मांस आढळले. पथकाने कारवाई करत वाहन चालक अल्पवयीन मुलासह जावेद शेख (वय २६, रा. चौक मंडई, जुने नाशिक) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३० हजारांचे १५० किलो मांस आणि १ लाख ५० हजारांचे वाहन असा सुमारे १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT