Two inn gangsters who were arrested along with Gavathi Kattya of Bhadrakali area. along with the team of Unit One of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : दोघा सराईत गुंडांना गावठी कट्ट्यासह अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

Crime News : रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार विशाल देवरे यांना सराईत गुंड गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची खबर मिळाली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : कथडा परिसरातून एका सराईत गुंडाला तर, चौक मंडईतून तडीपार गुंड या दोघांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. (Nashik Crime Two inn gangsters arrested with knife)

रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार विशाल देवरे यांना सराईत गुंड गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने कथडा रोडवरील भोई गल्लीत सापळा रचून संशयित मुज्जफर उर्फ मज्जू मैनौद्दिन शेख (४२, रा. भोई गल्ली, कथडा, भद्रकाली) यास अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३० हजारांचा बनावट कट्टा व एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आला.

तसेच, युनिट एकच्या पथकाला चौक मंडई परिसरात तडीपार गुंड आल्याची खबर मिळाली असता, पथकाने संशयित तडीपार गुंड आवेश उर्फ अव्वा निसार शेख (२३, रा. चौक मंडई, भद्रकाली) यास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ३० हजारांचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या दोघांविरोधात भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाकामी भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (latest marathi news)

सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, संदीप भांड, शरद सोनवणे, विशाल देवरे, नाझीम खान, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT