A suspect sitting in a four-wheeler with a chopper in his hand. esakal
नाशिक

Nashik Crime News : हल्ला करणाऱ्या संशयिताचा व्हिडीओ व्हायरल

Nashik Crime : लेखानगर येथे नुकताच गौळाणे (ता. नाशिक) गावच्या सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : लेखानगर येथे नुकताच गौळाणे (ता. नाशिक) गावच्या सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील पसार झालेल्या संशयितांनी अंबड पोलिसांच्या नाकावर टिच्चून, चारचाकीमध्ये धारधार शस्त्र दाखवत व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ता सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. यावरून व्हिडीओमुळे गुंड प्रवृत्ती आता पोलिसांनाही जुमानत नसल्याचे दिसून येत असून. (Crime video of attack suspect goes viral )

अद्यापही संशयित यांच्यावर कारवाई झालेली नाही. लेखानगर भागात एका गरीब व्यावसायिकास काहीनी मारहाण केली होती. याबाबत व्यावसायिकास पोलिसांत तक्रार करायला लावली म्हणून सरपंच अजिंक्य चुंभळे यांच्यावर धावून येत चार ते पाच जणांनी चॉपर व कोयते आणत जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी अंबड पोलिसात संशयित अजय आठवले, सोपियान शेख, शहारुख शेख, राजच आठवले, रोहित आठवले, रोहित मोरे (सर्व रा. लेखा नगर वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटना घडल्यानंतर संशयित कारने फरार झाल्याचा व्हिडिओ समोर आला असून, संशयित हातात चॉपर दाखवत गाण्यांमध्ये मग्न झाला आहे. या व्हिडिओची सर्वत्र एकच चर्चा रंगली असून, पोलिस आता तरी मनावर घेतील काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT