Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : विहितगावला लाचखोर तलाठ्याला अटक

Bribe Crime : लाचखोर तलाठी सतीश गिरीश नवले (वय ४८, रा. उपनगर) यांच्यासह त्यांचा खासगी मदतनीस दत्तात्रेय सुखदेव ताजनपुरे (४३, रा. चेहडी) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. ३) अटक केली.

सकाळ वृतसेवा

Nashik Bribe Crime : विहितगाव येथे कार्यरत लाचखोर तलाठी सतीश गिरीश नवले (वय ४८, रा. उपनगर) यांच्यासह त्यांचा खासगी मदतनीस दत्तात्रेय सुखदेव ताजनपुरे (४३, रा. चेहडी) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. ३) अटक केली. तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत होता. (Nashik Crime Vihitgaon Bribe Talathi arrested by police marathi news)

यामुळे नाशिकचे तहसीलदार यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र ०.०१चे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये एक लाखाचे २५ टक्केप्रमाणे २५ हजारांचा भरणा केला. यानंतर तहसीलदारांनी नवले यांना इतर अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमूल्य हा शेरा तक्रारदार यांचे पतीचे नाव असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा, असे आदेश दिले होते.

तक्रारदार यांचे काम प्रलंबित असल्याने नवले यांच्यासोबत त्यांचे काम करणारे खासगी मदतनीस ताजनपुरे यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात नवले यांच्या सांगण्यावरून चार हजारांची लाचेची मागणी पंचांसमक्ष केली.

तडजोडअंती त्यांनी तीन हजारांची लाच स्वीकारली असता सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप घुगे, नाईक गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT