Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : महिला पोलिस कर्मचाऱ्यास तरुणाकडून मारहाणीचा प्रकार! दहिपुलावरील घटना

Nashik News : महिला पोलिस कर्मचाऱ्याशी तरुणांकडून वाद घालून धक्काबुक्की करत मारहाण करण्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : महिला पोलिस कर्मचाऱ्याशी तरुणांकडून वाद घालून धक्काबुक्की करत मारहाण करण्याची घटना सोमवारी (ता. ८) दुपारी घडली. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महिला पोलिस कर्मचारी दहिपूल परिसरातून जाताना दुचाकीचा धक्का लागला. त्यातून तरुणाने त्यांच्याशी वाद घातला. (woman police officer was beaten up by young man)

त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यामुळे त्या जखमी झाल्या. त्यांनी त्या कार्यरत असलेल्या पोलिस पथकातील वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. वरिष्ठांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित पोलिस पथकास घटनास्थळी पोचण्याच्या सूचना केल्या. पथकाने घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली.

घटनास्थळावरून संशयित महेश दौलत गुरिया (वय २५, रा. जगताप मळा नाशिक रोड) यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यास पुढील चौकशीसाठी भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून उशिरापर्यंत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केली नाही. त्या मारत असताना बचावासाठी हात वर केला असता त्यांच्या तोंडास हात लागल्याचे संशयिताने सांगितले. घडलेल्या घटनेने काही वेळ दहिपूल परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. (latest marathi news)

मारहाणीची दुसरी घटना

महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करण्याची भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील ही दुसरी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे शालिमार येथे गेलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यास रस्त्यावर दुकान लावणाऱ्या एका संशयित तरुणाने मारहाण केली होती. वरिष्ठांना माहिती मिळताच त्यांनी संशयितास ताब्यात घेत कारवाई केली होती.

महापालिकेच्या माध्यमातून आठ दिवस सतत त्याठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या गुंडप्रवृत्तींना धडा शिकवला होता. त्यानंतर सोमवार (ता.८) अशाच घटनेची पुनरावृत्ती दहिपूल परिसरात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT