bribe  Sakal
नाशिक

Nashik Bribe Crime : ‘पाटबंधारे’च्या महिला कार्यकारी, सहाय्यक अभियंत्यांनी घेतली लाच

Bribe Crime : ६२ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगरच्या पथकाने पाटबंधारे विभागाच्या महिला सहाय्यक अभियंत्याला अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : पावणेआठ लाखांच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १८ टक्क्यांप्रमाणे एक लाख ३९ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करून ६२ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगरच्या पथकाने पाटबंधारे विभागाच्या महिला सहाय्यक अभियंत्याला अटक केली. या लाचेत १० टक्के लाच घेण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दुजारा दिल्याने दोघींविरोधात अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (nashik crime Women executive assistant engineers took bribe )

अहमदनगरच्या पाटबंधारे संशोधन व जलनिस्सारण उपविभागाच्या सहाय्यक अभियंता रुबिया मोहम्मद हनिफ शेख (वय ३५, रा. निर्मलनगर, अहमदनगर), नाशिकच्या मेरीच्या पाटबंधारे संशोधन विभागाच्या कार्यकारी अभियंता रजनी पाटील (रा. हरी आमंत्रण, दत्तमंदिर रोड, नाशिक रोड) अशा दोन लाचखोर महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत.

उंबरे (ता. राहुरी) येथे पूर्ण झालेल्या कामाचे सात लाख ७५ हजार ९६३ रुपयांच्या कामांचे बिल तक्रारदारने सादर केले. ते मंजूर करण्यासाठी श्रीमती शेख यांनी स्वतःसाठी आठ टक्के व श्रीमती पाटील यांच्यासाठी १० टक्के, असे एकूण १८ टक्क्यांप्रमाणे एक लाख ३९ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली. (latest marathi news)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पडताळणीत लाचखोरांनी १८ टक्के लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पथकाने गुरुवारी (ता. १८) सापळा रचला. त्यात रुबिया शेख यांनी पहिला हप्ता म्हणून ६२ हजार रुपये पंचांसमक्ष तक्रारदाराकडून स्वीकारले. त्यांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. लाचेची रक्कम स्वीकारण्यास श्रीमती पाटील यांनी दुजोरा दिला, म्हणून दोघींविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, किशोर लाड, राधा खेमनर, सना सय्यद, हारून शेख यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT