Murder News esakal
नाशिक

Nashik Crime News : पाथरे येथे मारहाणीत तरुणाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Crime News : जुन्या भांडणाची कुरापत काढून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे 40 वर्षीय तरुणास जमावाने मारहाण केली

सकाळ वृत्तसेवा

वावी : जुन्या भांडणाची कुरापत काढून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे 40 वर्षीय तरुणास जमावाने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील 13 जणांच्या विरोधात खुन व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Youth beaten to death in Pathare news)

सोमनाथ भाऊसाहेब आदमाने असे मारहाणीत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आपल्या कुटुंबासमवेत ते पाथरे बुद्रुक शिवारात राहतात. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आदमाने कुटुंबीय जेवण करून झोपण्याच्या तयारीत असताना गावातील राहटळ कुटुंबातील व्यक्तींनी जमावाने येऊन घराचा दरवाजा तोडला व घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली.

लाकडी दांडे लोखंडी पाईप लोखंडी गज यासारख्या प्राणघातक वस्तूंनी मारहाण केल्यामुळे सोमनाथ आदमाने हे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत कोपरगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  (latest marathi news)

सून मनीषा व नात संस्कृती यांना देखील यावेळी मारहाण करण्यात आली असे मृताचे वडील भाऊसाहेब आदमाने यांनी म्हटले आहे. शरद दगु राहटळ, संतोष दत्तात्रय राहटळ, सागर शरद राहटळ, नितीन बाळासाहेब राहटळ यांनी केलेल्या मारहाणीत मुलगा सोमनाथ याचा मृत्यू झाला.

तर सचिन बाळासाहेब राहटळ, तुषार राजेंद्र राहटळ, रविंद्र दत्तात्रय राहटळ, तेजश्री सचिन राहटळ, मंदाकिनी दत्तात्रय राहटळ, अनिता संतोष राहटळ , सुनिता शरद राहटळ, शैला बाळासाहेब राहटळ, ज्योती रविंद्र राहटळ सर्व रा पाथरे बु. यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना मारहाण केली असे श्री. आदमाने यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार वरील सर्वांचे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पाराजी वाघमोडे, हवालदार सचिन काकड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT