A crown made by relatives outside the police station in Lasalgaon. esakal
नाशिक

Nashik Crime News : हल्ल्यात जखमी झालेल्या सोमठाणेच्या तरुणाचा मृत्यू! शेतीच्या वादाची किनार

Nashik News : शेतजमिनीच्या वादातून सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील ३० वर्षीय युवकावर सोमवारी सायंकाळी शेजारच्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शेतजमिनीच्या वादातून सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील ३० वर्षीय युवकावर सोमवारी (ता. १) सायंकाळी शेजारच्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. चॉपर व कोयत्याने वार करण्यात आल्याने या युवकावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. (Nashik Crime News)

मात्र, त्याची प्रकृती ढासळल्याने त्यास बुधवारी (ता. ३) रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे गुरुवारी (ता. ४) सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे सोमठाणे गावात सायंकाळी अंत्यविधीपूर्वी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मृताच्या नातेवाइकांनी हल्ल्याची सुपारी देणाऱ्या संशयिताच्या घरासमोर अंत्यविधी करण्याची भूमिका घेतल्याने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

कृष्णा ऊर्फ किशोर रामभाऊ धोक्रट (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. गावातीलच सचिन गोविंद कोकाटे याच्याबरोबर त्याचे शेतजमिनीचे वाद होते. याशिवाय, सचिन याची पत्नी त्याला सोडून तिच्या आई-वडिलांकडे राहत असल्याने व तिचे नातेसंबंधातील धोक्रट कुटुंबाकडे जाणे-येणे असल्यानेही सचिन याचा कृष्णा व त्याच्या कुटुंबीयांवर राग होता.

पत्नीला धोक्रट कुटुंबीय व कृष्णा फूस लावत असल्याने ती नांदायला येत नसल्याचा संशय सचिनला होता. सोमवारी सायंकाळी खेडलेझुंगे येथील सोमठाणेकडे जाणाऱ्या त्रिफुलीवर दोन स्थानिक युवकांसह आणखी चौघांनी कृष्णावर चॉपर व कोयत्याने वार केले होते. हा हल्ला सचिन कोकाटे याने त्याचे चुलते बाळासाहेब रघुनाथ कोकाटे यांच्या मदतीने सुपारी देऊन घडवून आणल्याची फिर्याद मृत कृष्णाचा भाऊ प्रवीण ऊर्फ सोनू धोक्रट याने लासलगाव पोलिस ठाण्यात दिली होती. (latest marathi news)

राहुल ऊर्फ डोम्या सुभाष आहेर व विकास ऊर्फ विकी सोमनाथ गायकवाड (दोघे रा. खेडलेझंगे, ता. निफाड) व त्यांच्या इतर अनोळखी चार साथीदारांनी वरील दोघांकडून सुपारी घेऊन हा हल्ला केल्याचे प्रवीणने फिर्यादीत म्हटले होते. प्राणघातक हल्ला झाल्यावर कृष्णा यास स्थानिकांनी निफाड येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलविले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने नाशिक येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले.

त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच, कोयत्याचे वार केल्याने पोटातून कोथळा बाहेर पडला होता. अवघड शस्त्रक्रिया करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने व मोठा उपचारांचा खर्च पेलविणारा नसल्याने कृष्णा यास जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान त्याचा गुरुवारी सकाळी नऊला मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

तणावाची परिस्थिती

कोकाटे व धोक्रट कुटुंबीयांमध्ये असणारे शेतीचे व कौटुंबिक वाद सर्वांना माहीत असल्याने आणि सचिन कोकाटे याच्याकडून यापूर्वीही अनेकदा कृष्णा यास धमकावण्यात आल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी नाशिक येथून मृतदेह ताब्यात घेतल्यावर अंत्यविधी सोमठाणे येथे अमरधाममध्ये न करता कोकाटे कुटुंबीयांच्या घरासमोर करण्याची भूमिका घेतली.

त्यामुळे सोमठाणे गावात तणावाची परिस्थिती तयार झाली होती. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सिन्नर व निफाड तालुक्यातील पोलिसांचा लवाजमा सोमठाणे येथे तैनात करण्यात आला होता. धोक्रट यांच्या नातेवाइकांची वरिष्ठ पोलिस अधिकारी समजूत काढत होते. संशयित सचिन कोकाटे व बाळासाहेब कोकाटे यांना लासलगाव पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले असल्याचे सांगूनही नातेवाईक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

पोलिस ठाण्यासमोर लासलगावला ठिय्या

लासलगाव खेडलेझुंगे (ता. निफाड) येथे १ जुलैला जमिनीच्या वादातून भर चौकात कृष्णा ऊर्फ किशोर धोक्रट या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्यावर त्याचा गुरुवारी (ता. ४) उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी थेट लासलगाव पोलिस ठाणे गाठून मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी करीत ठिय्या आंदोलन केले. तणावाची परिस्थिती उद्‍भवल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीच्या दरवाढीनंतर सरकारी कंपन्यांचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 'राष्ट्रवादी’तर्फे आज निदर्शने

SCROLL FOR NEXT