Sub-inspector Sandeep Patil and colleagues of the local crime branch team arrested Rafiq Amin Shah alias Lamba Rafiq, the prime suspect in the murder case of Sangmeswar area.  esakal
नाशिक

Nashik Crime News : संगमेश्‍वर भागात युवकाचा खून; मुख्य संशयितास अटक

Crime News : शहरातील संगमेश्‍वर भागात मौलाना इसहाक चौक कमानीजवळ मागील भांडणाच्या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्याचा प्रकार घडला.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील संगमेश्‍वर भागात मौलाना इसहाक चौक कमानीजवळ मागील भांडणाच्या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्याचा प्रकार घडला. सोमवारी (ता. १५) मध्यरात्री हा प्रकार घडला. या खुनाच्या प्रकरणातील वादाला अवैध दारु विक्री व्यवसायाची किनार असल्याचे समजते. पोलिसांनी खून प्रकरणी मुख्य संशयित असलेल्या २८ वर्षीय तरुणास अवघ्या तीन तासांतच अटक केली आहे. (Nashik Crime Youth killed in Sangameshwar area Main suspect arrested marathi news)

याबाबतची माहिती अशी रफिक अन्वर खान (रा. संगमेश्‍वर) हा त्याचे दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजुला उभा होता. त्याचवेळी तेथे त्याचा मित्र रफिक अमीन शहा उर्फ लंबा रफिक व त्याचा जोडीदार (नाव समजू शकले नाही) तेथे आले. दोघांना मागील भांडणाची कुरापत काढून रफिक खान यास शिवीगाळ केली.

दोघा संशयतींनी त्याच्यावर धारदार हत्याराने डोक्यावर, हातावर व मांडीवर वार केले. यात रफीक जागीच ठार झाला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खुनानंतर दोघे संशयित फरार झाले.

या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक अधिक्षक तेघबीरसिंग संधु, सुरज गुंजाळ यांनी यातील संशयितांना तातडीने अटक करण्यासाठी छावणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेश दिले. (latest marathi news)

यानंतर छावणी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु केला. पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मुख्य संशयित रफिक शहा उर्फ लंबा हा मनमाडच्या दिशेने दुचाकीवर जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, उपनिरीक्षक संदिप पाटील, हवालदार चेतन संवत्सरकर, पोलिस नाईक शरद मोगल, योगेश कोळी, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्या पथकाने सापळा रचून मनमाड येथील रेल्वेस्टेशन परिसरातून खुन प्रकरणातील मुख्य संशयित रफिक शहा उर्फ लम्बा रफिक (वय २८, रा. संगमेश्वर) यास ताब्यात घेतले.

गुन्ह्यात वापरलेली होण्डा युनिकॉर्न मोटरसायकल देखील हस्तगत केली आहे. पोलिसांनी त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार फैसल (पुर्ण नाव माहित नाही) याच्यासह खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून अन्य एका संशयिताचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : १८ चेंडूंत ७२ धावा… पृथ्वीचे वादळी शतक, Ranji Trophy स्पर्धेच्या इतिहासातील सहावी वेगवान Century

महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध? शवविच्छेदन अहवाल बदलण्याचं रॅकेट?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना नेत्याची सून होणार, साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल, होणारा नवरा काय करतो?

UPI Mapper ने घातलाय धुमाकूळ! UPI अ‍ॅप्सच्या हुशारीमुळे युजर्स गोंधळात; NPCI ने घेतला मोठा निर्णय, ऑनलाइन पेमेंट करत असाल तर हे एकदा बघाच

Kolhapur Politics : 'आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरला 50 वर्षे मागे नेले'; खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT