Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : पंचवटीतील हनुमान वाडीत चॉपरने मारून युवकाची लुटमार; लुटमार, चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Crime News : याप्रकरणी पंचवटी पोलिसात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरात लुटमार अन्‌ चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. पंचवटीमध्ये एका घटनेत युवकाला चॉपरने मारून लुटमार केली तर दुसऱ्या घटनेत गंगाघाटावर महिलेच्या पिशवीला ब्लेड मारून त्यातील दागिनेच चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Youth robbed by chopper in Hanuman wadi in Panchvati)

कामावरून घराकडे परतणाऱ्या युवकाला पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने चॉपरने वार करून जखमी केले. त्यानंतर एकाने त्यास पकडून ठेवत दुसऱ्याने चॉपरचा धाक दाखवून त्याच्या खिशातील ३ हजारांची रोकड आणि मोबाईल असा १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना घडली.

विजय शंकर गहिले (२९, रा. काकड बाग, मोरेमळा, रामवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, सदरचा प्रकार गुरुवारी (ता १) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हनुमानवाडीतील राका लॉन्ससमोर घडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत. (latest marathi news)

तसेच, कपालेश्वर मंदिराच्या बाजुला असलेल्या वरद विनायक गणेश मंदिराजवळ दोघा अज्ञात संशयितांनी ६५ वर्षीय महिलेला बक्षिस लागल्याचे सांगत त्यांना प्रसाद खाण्यासाठी दिला. प्रसाद खाल्ल्यानंतर महिलेस काही मिनिटे काही सूचले नाही. यादरम्यान दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व एक पोत असा ३५ हजार रुपयांचा ऐवज बोलण्याच्या नादात काढून घेत पोबारा केला.

विजया वसंत साखरे (रा. खटोड पार्क, क्रांतीनगर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. २) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सदरचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Cabinet Meeting Decision: विद्यार्थ्यांसह खेळाडूंना फायदा होणार, मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय

Government Contractors: शासकीय कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची देयके थकीत; तातडीने पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Marathi News Live Updates : अंमलबजावणी संचालनालयाने आंध्र प्रदेशचे माजी नागरी पुरवठा मंत्री आणि माजी आमदार कारुमूरी वेंकट नागेश्वर राव यांना अटक केली

Gadchiroli Hospital: गडचिरोलीत दुर्दैवी घटना! ‘इथेच सिझर करा’ कुटुंबीयांची विनंती, तरीही रेफर; बाळासह २१ वर्षीय मातेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT