A crowd of women for shopping at Anjuman Chowk here. esakal
नाशिक

Ramadan Eid 2024 : चॉंदरातच्या खरेदीला लागले चार चॉंद! अंजुमन चौकात गर्दी

Ramadan Eid : शहरात चॉंदरातच्या खरेदीला नागरीकांची झुंबड उडाली होती. किदवाई रोड, भंगार बाजार, मोहम्मद अली रोड राज्यात प्रसिद्ध आहे.

जलील शेख

Ramadan Eid 2024 : शहरात चॉंदरातच्या खरेदीला नागरीकांची झुंबड उडाली होती. किदवाई रोड, भंगार बाजार, मोहम्मद अली रोड राज्यात प्रसिद्ध आहे. स्वस्तात मस्त कपडे मिळत असल्याने अनेक नागरीकांचा कल किदवाई रोडकडे असतो. किदवाई रोडवर मुस्लिम बांधवांबरोबरच हिंदू बांधवही मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. येथे लॉटचा माल स्वस्तात मिळत असल्याने अनेकजण खरेदी करताना दिसत होते. ()

रमजान महिन्यात अनेकजण किदवाई रस्त्यावर हजेरी लावत खरेदी करतात. त्यामुळे ईदच्या खरेदीला चार चॉंद लागले आहेत. येथील किदवाई रोडवर मोठ्या प्रमाणात चप्पल, बुट, कपड्यांची दुकाने लागली आहेत. दुकानदारांमध्ये स्पर्धा असल्याने कमी किंमतीत वस्तू विकण्याचा फंडा आहे. अंजुमन चौक, मोहम्मद अली रोड, किदवाई रोड येथे परराज्यातील बहुसंख्य विक्रेते रुमाल, मोजे यासह विविध वस्तू विक्रीसाठी आले आहेत.

गुरुवारी (ता. ११) शहरात ईदची नमाज होणार आहे. त्यामुळे खरेदीला चार चॉंद लागले आहेत. बहुतांश कामगारांना बुधवारी (ता. १०) रात्री उशिरापर्यंत बोनस मिळाला. त्यामुळे अनेक नागरीक रात्री खरेदी करीत होते. यात प्रामुख्याने बुट, चप्पल, घड्याळ, चष्मा, पॉकीट, बेल्ट, रेडीमेड कपडे, टोपी आदी वस्तूंच्या दुकानांवर नागरीकांची झुंबड उडाली होती. हजार रुपयात ड्रेस, चप्पल, पाकीट, बेल्ट, टोपी मिळत होती. पाचशे रुपयांचा ड्रेस, तर दीडशे रुपयाला चप्पल, टोपी पन्नासला मिळत होत्या.(latest marathi news)

बांगड्यांच्या विक्रीत वाढ

अंजुमन चौक, गांधी मार्केट, ईकबाल डाबी, आयशानगर या ठिकाणी बांगड्या व महिलांची सौंदर्य प्रसाधने आदी साहित्यांची दुकाने लागली होती. महिलांनी याठिकाणी गर्दी केली होती. येथे ३० रुपये डझन ते ५० रुपये डझनपर्यंत बांगड्या विकल्या गेल्या. बांगड्या उत्तरप्रदेश येथून येत असून, महिलांनी ड्रेसवर मॅचींग बांगड्या खरेदी केल्या. बांगडी विक्रीतून शहरात लाखोंची उलाढाल झाली.

मेहंदी कोनला मागणी

सण-उत्सव, लग्नसराई व इतर वेळेस मेहंदी कोनला मोठी मागणी असते. महिला मेहंदी कोनला पसंती देतात. महागाई वाढली तरी मालेगावी अवघ्या पाच रुपयाला कोन मिळत आहे. येथे मेहंदी कोन बनविणारी १२ ते १३ दुकाने आहेत. मेहंदी काढणाऱ्या महिलांकडे अनेक महिला मेहंदी काढताना दिसत होत्या. २२ व्या रोजापासून मेहंदी व्यवसाय तेजीत होता. ग्रामीण भागातही कोनला पसंती असल्याचे दिलकश मेहंदीचे संचालक सिराज यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT