shares Profit Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: स्टॉक IPO अन्‌ शेअरवर बोनसमधून चिक्कार नफा! डॉक्टरला घातला तब्बल दीड कोटींना गंडा; सायबर भामट्यांचा प्रताप

Crime News : याप्रकरणी शहर सायबर पोलिसात सोशल मीडियावरील अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघडकीस आलेले असतानाही, शहरातील आणखी एका डॉक्टराला सायबर भामट्याने तब्बल दीड कोटींची फसवणूक केली आहे.

एका शेअरवर बोनस, आणि कंपनीचे स्टॉक आयपीओवर निव्वळ नफा देण्याचे अमिष सायबर भामट्यांनी दाखविले होते. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात सोशल मीडियावरील अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Cyber ​​Crime doctor cheated to one half crores)

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डॉक्टरसह दोघांना सायबर भामट्यांनी २८ मार्च ते २० मे यादरम्यान वेगवेगळ्या व्हाटस्अॅप आणि इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन संपर्क साधला होता. त्यावेळी भामट्यांनी आम्ही शेअर मार्केटमधील अधिकृत कंपनीचे ब्रोकर असून, गुंतवणूक करायचीच आहे आणि आर्थिक फायदाच हवा असेल तर आमच्याकडे ट्रेडिंग, स्टॉक टू आयपीओ घेण्याचे व त्यातून जादा परताव्याचे अमिष दाखविले.

तसेच, शेअर मार्केटमधील स्टॉक आणि आयपीओ स्वतंत्ररित्या घेतल्यास आर्थिक फायद्याचे असल्याचे सांगत, कंपनीचे ट्रेड, स्टॉक आम्हीच विकू शकतो, त्यामुळे गुंतवणूकदारास कुठलेही आर्थिक नुकसान होत नाही असेही पटवून सांगितले होते. (latest marathi news)

सायबर भामट्यांनी विश्वास संपादन केल्याने डॉक्टरसह दोघांनी आर्थिक गुंतवणूक करण्यास समर्थता दर्शविली. यानंतर संशयित सायबर भामट्यांनी संबंधित मोबाईल अॅपवरुन इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून स्टॉक ट्रेडींग व आयपीओ कन्फर्म अलॉटमेंट दिसतील असे भासविण्याचा बहाणा करुन जास्त नफा मिळेल, असे दाखविले.

संशयितांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरने तब्बल १ काेटी ४३ लाख रुपये गुंतविले, तसेच इतर दाेघांनीही एकूण १३ लाख रुपये गुंतविले. संशयितांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर पैसे भरले असता संशयितांनी काही प्रमाणात नफा बँक खात्यात क्रेडिट झाल्याचे भासविले. प्रत्यक्षात हे पैसे डाॅक्टरसह इतरांच्या बँक खात्यात आलेच नाही. यात फसवणूक झाल्याचे उघड होताच, त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT