नाशिक

अवकाळीचा जिल्‍ह्‍यात शिरकाव

CD
३६-३ जिल्ह्यात दोन दिवस पावसाची शक्‍यता -------------- हवामान खात्याचा अंदाज ः मुरासू चक्रीवादळाचा परिणाम ------------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ः राज्‍यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असताना, सोमवारी (ता.२) नाशिक शहरासह जिल्‍हाभरात ढग दाटून आले होते. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. पुढील दोन दिवस पावसाची तसेच ढगाळ वातावरण राहणार असल्‍याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. पश्‍चिम- मध्य बंगालच्‍या उपसागरावर केंद्रित ''मुरासू'' चक्रीवादळ वायव्‍य दिशेने सरकण्याची आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्‍या किनारपट्टीवर धडकण्याची शक्‍यता आहे. यामुळे पूर्व- मध्य समुद्रात कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राच्‍या किनारपट्टीलगत समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर हवेत चक्रीय स्‍थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्‍यातील इतर भागांप्रमाणे नाशिक जिल्‍ह्‍यातही अवकाळी पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे. भौगोलिक स्‍थितीमुळे पुढील दोन दिवस पावसाची शक्‍यता कायम राहणार आहे. राज्‍यात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्‍याचे दृश्‍य बघायला मिळत आहेत. सोमवारी (ता.२) नाशिक शहरासह ग्रामीण भागात सकाळच्‍या वेळी ढग दाटून आले होते. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी पावसाच्‍या थेंबांचा हलका शिरकाव झाला. यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. म्‍हसरुळ, दिंडोरी रोड भागात तुरळक पाऊस झाला. दरम्‍यान हवामान खात्‍याच्‍या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनांसह पाऊस, विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता आहे. गुरुवार (ता.५) पासून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. --- इन्‍फोः कमाल तापमान तीस अंशांच्‍या आत यंदा सप्‍टेंबरपासूनच तप्त उन्‍हाच्‍या झळा जाणवत होत्‍या. त्‍यानंतर ऑक्‍टोबर हिटने नाशिककरांची लाहीलाही झाली होती. अनेक दिवसांनंतर सोमवारी नाशिकचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आत पोहचले. या दिवशी नाशिकचे कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे. यामुळे कमाल व किमान तापमानातील तफावत अतिशय कमी झाली आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राजकीय संघर्ष नव्या वळणावर; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; ‘हिम्मत असेल तर...!’

Latest Marathi News Live Update : पायल पवार-झांबरे प्रकरणात मोठी अपडेट; पुणे स्वारगेट पोलिस ठाण्यात पती, सासू-सासऱ्यांसह नणंदेवर गुन्हा दाखल

Paithan Sugar Factory: ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पैठणमधील रेणुकादेवी साखर कारखाना बंद

NCP leaders meet Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय? वरिष्ठ नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर पक्षाचं स्पष्टीकरण; भेट नेमकी कशासाठी?

Nanded Crime News: जागेच्या वादातून टेम्पो अंगावर घातल्याचा आरोप; अरुण कुंटे यांच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

SCROLL FOR NEXT