fund sakal
नाशिक

Nashik Damage Road: ‘संकट हीच संधी’ मानण्याची परंपरा कायम; खड्ड्यांची रांगोळी बुजविण्यासाठी 104 कोटी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Damage Road : यंदा पुरेसा व दमदार पाऊस झाला नसतानादेखील नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांची रांगोळी तयार झाल्याने ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी महापालिकेच्या बांधकाम विभागाने पुन्हा ठेकेदारांना १०४ कोटी रुपयांची खैरात खड्डे बुजविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा संकट हीच संधी मानण्याची परंपरा या वर्षीदेखील कायम राहिली आहे. (Nashik Damage Road 104 crores for potholes nashik)

नाशिक शहरात गेल्या पाच वर्षात बाराशे कोटींहून अधिक निधी हा नवीन रस्त्यांसाठी खर्च करण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त दरवर्षी जवळपास ४० कोटी रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला.

रस्त्यांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याचे स्पष्ट होत असतानादेखील ठेकेदारांवर कारवाई होत नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात जनहित याचिका दाखल आहे, तर राजकीय पक्षांनीदेखील आंदोलने सुरू केली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोशल मीडियावर रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेची अब्रू वेशीवर टांगली आहे. अशा परिस्थितीत कारवाई करण्याऐवजी ठेकेदारांना खड्डे बुजविण्यासाठी १०४ कोटी ३३ लाख रुपयांचे कंत्राटे देण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम विभागाकडून स्थायी समितीवर कार्यारंभ आदेश देण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

पश्चिम विभागात वीस कोटी ६४ लाख २५ हजार ६१६ तर सिडको विभागात वीस कोटी दहा लाख ८९ हजार, तसेच नाशिक रोड विभागात १८ कोटी ९३ लाख ४८ हजार १४१, पूर्व विभागात १४ कोटी ९० लाख ९० हजार १७६ रुपये, पंचवटी विभागात १४ कोटी ५० लाख १६ हजार १३६ तर सातपूर विभागात १५ कोटी २३ लाख ३७ हजार २६५ रुपये खड्डे बुजविण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT