Crop Damage esakal
नाशिक

Unseasonal Rain Crop Damage : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करावी; तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे आवाहन

Nashik News : निफाड तालुक्यात अजूनही नुकसानीची शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण न केल्याने त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत व त्यात शेतकऱ्यांचेच आर्थिक नुकसान होते.

सकाळ वृत्तसेवा

नैताळे : नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, गारपीट या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे होतात. पंचनाम्याच्या अनुषंगाने शासनातर्फे निधीवाटप करण्यात येतो. शासन निर्देशानुसार संबंधित शेतकऱ्यांची ई केवायसीद्वारा ओळख पटवून ते पैसे बाधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होतात.

मात्र, निफाड तालुक्यात अजूनही नुकसानीची शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण न केल्याने त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत व त्यात शेतकऱ्यांचेच आर्थिक नुकसान होते. शासनाच्या मदतीचा सामान्य शेतकऱ्यांना लाभ होत नाही. (Nashik Damaged crop farmers should complete e KYC Appeal of Tehsildar Vishal Naikwade marathi news)

शेतकऱ्यांनी गावातील सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रात जाऊन तत्काळ ई केवायसी करून घ्यावी, अन्यथा पैसे परत गेल्यास त्यास संबंधित शेतकरी जबाबदार राहतील. ई केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांच्या याद्या सेतू व आपले सरकार केंद्रांना पाठविल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली. बाधित शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक, स्वतःचा थंब, हे ई केवायसीसाठी आवश्यक आहे. (latest marathi news)

शिल्लक राहिलेली शेतकरी संख्या

-मार्च २०२३ अवकाळी पाऊस- ५२७

-२०२१-२२ गारपीट व अवकाळी पाऊस- १७३६

-सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ अतिवृष्टी- ३०

-सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ सततचा पाऊस- २,९०७

-नोव्हेंबर २०२३ अवेळी गारपीट- १,४८६

-एप्रिल २०२३ अवकाळी पाऊस- २६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT