Nashik NMC News esakal
नाशिक

Nashik NMC News : बंदोबस्तात धोकादायक इमारती, वाडे उतरविणार; महापालिका आयुक्तांच्या सूचना

Nashik News : महापालिकेकडून धोकादायक वाडे, घरे, इमारतींच्या मालकांना धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून धोकादायक वाडे, घरे, इमारतींच्या मालकांना धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहा विभागीय कार्यालयांमार्फत घरमालक, भाडेकरूंना नोटिसा पाठविल्या. मालक किंवा भाडेकरूंनी धोकादायक भाग स्वतः न उतरविल्यास पोलिस बंदोबस्तात उतरवून तो खर्च संबंधितांकडून वसुल केला जाणार आहे. (Dangerous buildings and mansions demolished)

शहरात एक हजारांहून अधिक धोकादायक इमारती व वाडे आहेत. बहुतांश वाडे जुने नाशिक व पंचवटी भागात आहेत. वाडे ढासळण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सहा विभागीय कार्यालयांमार्फत धोकादायक वाडे खाली करण्याच्या सूचना दिल्या जातात.

परंतु एकदा नोटीस बजावल्यानंतर त्याकडे फारसे महापालिका किंवा त्या जागेत राहणारे भाडेकरू, मालक लक्ष देत नाही. एखादी दुर्घटना घडल्यास महापालिकेचे अधिकारी नोटीस बजावल्याचे कारण देवून हात वर केले जातात. आर्थिक नुकसान किंवा जागेवरचा दावा जाईल म्हणून तेथे राहणारे घर सोडत नाही.

परंतु महापालिकेने आता वाड्यासंदर्भात ठोस धोरण स्वीकारले आहे. तीस वर्ष पूर्ण झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करून ती जागा राहण्यायोग्य आहे की नाही याबाबत प्रमाणपत्र घ्यावे त्यानंतरच निर्णय घ्यावा. राहण्यायोग्य घर नसल्यास त्या जागेत वास्तव्य करू नये किंवा नवीन इमारत बांधावी अशा स्पष्ट सूचना आहेत. (latest marathi news)

परंतु याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. दुर्घटना घडल्यानंतरच विषय चर्चेला येतो. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शहरातील धोकादायक इमारती, घरे, मोडकळीस आलेल्या जुने वाडे उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या. धोकादायक, इमारती, वाड्यांमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी सुरक्षित जागी स्थलांतरित होण्याच्या सूचना देताना अन्यथा पोलिसांच्या मदतीने इमारती मोकळ्या करण्याचा इशारा दिला आहे.

इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट

शहरातील जुन्या इमारती ढासळण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारती, वाडे, घरांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यास २५ हजार रुपये दंड किंवा मालमत्ता कराएवढी रक्कम मिळकतधारकाला द्यावी लागणार आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेज, सिव्हिल टेक, संदीप पॉलिटेक्निक या संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करता येणार आहे.

विभाग धोकादायक घरे, वाडे

पश्चिम ६००

पंचवटी १९८

पूर्व ११७

नाशिकरोड ६९

सातपूर ६८

सिडको २५

--------------------------

एकूण १०७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT