Bala Darade and Kiran Gamane-Darade while breaking the fast by eating apples from the hands of district head Sudhakar Badgujar at the hunger strike site. esakal
नाशिक

Hunger Strike : लिंबूपाणी नसल्याने दराडे दांपत्याने सफरचंद खाऊन सोडले उपोषण

Nashik News : संभाजी स्टेडियमच्या कामासंदर्भात दराडे दांपत्यांनी उपोषण केले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मंजूर केल्यानेअवघ्या तीन तासात उपोषण सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : संभाजी स्टेडियमच्या कामासंदर्भात दराडे दांपत्यांनी उपोषण केले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मंजूर केल्यानेअवघ्या तीन तासात उपोषण सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली. ऐनवेळी लिंबूपाणी उपलब्ध न झाल्याने सफरचंद खाऊन त्यांनी उपोषण सोडल्याने याही उपोषणाची चर्चा सर्वत्र रंगू लागली. (Nashik Darade couple went on hunger strike regarding work of Sambhaji Stadium)

सिडकोतील संभाजी स्टेडिअम दुरवस्थेसह विविध समस्यांबाबत मंगळवारी (ता.१६) शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख विलास शिंदे, विभागप्रमुख बाळा दराडे, काँग्रेसचे विजय पाटील,

विकी गामने यांच्यासह शिवसैनिक, नागरिक तसेच महापालिकेचे अधिकारीदेखील उपस्थित होते. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते बाळ दराडे यांनी सफरचंद खाल्ले, तर विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या हस्ते माजी नगरसेविका किरण गामणे दराडे यांनी सफरचंद खाऊन उपोषण सोडले.

स्टेडिअममध्ये खेलो इंडिया खेलो प्रकल्पाच्या माध्यमातून स्टेडियमचे विकासकाम सुरू आहे. मात्र यास सहा वर्ष झाले. तरीही अद्याप विकासकाम पूर्ण झाले नाही. काम संथगतीने सुरू असल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मैदानातील स्वच्छतागृहांची साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. (latest marathi news)

सर्वत्र ठिकाणी गाजरगवत पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्टेडियमची मोठी दुरवस्था झाली असली तरीही महापालिका प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रभागाच्या माजी नगरसेविका किरण गामणे- दराडे.

पती शिवसेना विभागप्रमुख बाळ दराडे यांच्यासह शिवसैनिक व क्रीडाप्रेमींनी उपोषण करत तत्काळ या ठिकाणच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. त्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी सदर कामे त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल; 'एक मराठा लाख मराठा' आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी

कमिशन हवंय तुम्हाला? आतापर्यंत किती खाल्लं? न्यायमूर्तींनी IAS अधिकाऱ्याला झापलं, वकीलही शांत बसले; पाहा VIDEO

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकलं; मनोज जरांगेंची तोफ आझाद मैदानात धडाडणार

Weather Update : गोवा, कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय; मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत 'हवामान'ची स्थिती कशी?

Mahabaleshwar News:'वेण्णा लेकनजीक आढळले अजगर'; भक्ष्याच्या शोधार्थ वावर; वन विभाग, सह्याद्री प्रोटेक्टर्समार्फत रेस्क्यू

SCROLL FOR NEXT