नाशिक

जालन्यातील खून प्रकरणातील दोघांना नाशिकमध्ये बेड्या

CD
फोटो : H31367 नाशिक : घनसावंगी (जि. जालना) येथील खून प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित. समवेत शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक. खून प्रकरणातील दोघांना बेड्या जालना पोलिसांच्या स्वाधीन; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : घनसावंगी (जि. जालना) येथील भरदिवसा घडलेल्या खून प्रकरणातील दोघा संशयितांना नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांना पुढील तपास कामासाठी जालना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नीलेश राजेंद्र धनगर (२५, रा. म्हसरूळ, दिंडोरी रोड), दर्शन अशोक पाटील (२४, रा. देवकृपा सोसायटी, सौभाग्यनगर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, घनसावंगीत गेल्या ३० सप्टेंबरला अज्ञात चौघांनी धारदार कोयत्याने वार करून एकाचा खून केला होता. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात खूनाचा दाखल आहे. याच गुन्ह्यातील संशयित हे नाशिकचे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथक संशयितांचा शोध घेत होते. दरम्यान, शनिवारी (ता. ३) हवालदार प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे यांना दोन संशयित द्वारका परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने द्वारका सर्कल ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ सापळा रचला. या दरम्यान संशयितरीत्या येणाऱ्या दोघांना सापळा रचून जागीच ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रेय पोटे, रमीज शेख, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी व अनुजा येलवे यांच्या पथकाने कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango GI Tag : कोकण हापूस विरुद्ध गुजरातचा वलसाड हापूस वाद शिगेला! अंतिम सुनावणीत नेमकं काय घडलं? संपूर्ण कोकणाचे लक्ष निकालाकडे

Indian Railway Ticket Transfer Rules : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! ऐनवेळी प्रवास रद्द झाल्यास तिकीट वाया जाणार नाही; घरच्यांच्या नावावर करता येणार ट्रान्स्फर, वाचा नियम

Kolhapur Water Pumping Ban : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! भोगावती आणि पंचगंगा नदीकाठावर 'या' दिवशी राहणार उपसाबंदी; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द

Latest Marathi News Live Update : करवीरला दुष्काळी यादीतून वगळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; आमदार चंद्रदीप नरके यांचा इशारा

Dharashiv News: डोळ्यादेखत बस जळून खाक; चालकाच्या एका निर्णयाने वाचले १५ जीव!

SCROLL FOR NEXT