Deadline for registration for MDS admission till Monday esakal
नाशिक

Nashik News : ‘एमडीएस’ प्रवेशासाठी नोंदणीची सोमवारपर्यंत मुदत; राज्‍यस्‍तरीय कोट्याची प्रक्रिया

Nashik News : वैद्यकीय शाखेतील दंतशास्‍त्र शाखेतील पदव्‍युत्तर अभ्यासक्रम एमडीएसच्‍या प्रवेशाची प्रक्रिया गुरुवार (ता. ११)पासून सुरू होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वैद्यकीय शाखेतील दंतशास्‍त्र शाखेतील पदव्‍युत्तर अभ्यासक्रम एमडीएसच्‍या प्रवेशाची प्रक्रिया गुरुवार (ता. ११)पासून सुरू होत आहे. राज्‍यस्‍तरावरील कोट्यासाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, नीट एमडीएसच्‍या कामगिरीच्‍या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करता येईल. प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्‍यक नोंदणीसाठी सोमवार (ता. १५)पर्यंत मुदत आहे. (Deadline for registration for MDS admission till Monday)

राज्‍यभरातील शासकीय महाविद्यालये, महापालिका, राज्‍य व केंद्र शासनातर्फे अनुदानित व विनाअनुदानित, खासगी, अल्पसंख्याक दंतशास्‍त्र महाविद्यालयात उपलब्ध जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया असणार आहे. नीट-एमडीएस २०२४ परीक्षा दिलेल्‍या पात्रताधारक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

पहिल्‍या प्रवेश फेरीपर्यंतची प्रक्रिया याच महिन्‍यात पूर्ण होणार आहे. सद्यःस्‍थितीत केवळ पहिल्‍या फेरीपर्यंतचे वेळापत्रक जारी केलेले असून, या फेरीतील रिक्‍त जागांचा अंदाज घेत पुढील प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. (latest marathi news)

...असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

प्रवेशप्रक्रियेत सहभागासाठी नोंदणी ------ ११ ते १५ जुलै

ऑनलाइन शुल्‍क भरणे, कागदपत्र अपलोडची मुदत --- १५ जुलैपर्यंत

जागांचा तपशील, प्रारूप गुणवत्तायादी प्रसिद्धी --------- १६ जुलै

पहिल्‍या फेरीसाठी प्राधान्‍यक्रम नोंदणीची मुदत ----- १६ ते १८ जुलै

पहिल्‍या फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्धी --- १९ जुलै

पहिल्‍या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत ---------- २० ते २४ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT