Officials of Sri Ganesh Mookbadhir Mitra Mandal giving information about the procession to family members and colleagues in sign language. esakal
नाशिक

Nashik Ganesh Visarjan Miravnuk : व्हिडिओ कॉलवरून ‘त्यांनी’ लुटला मिरवणुकीचा आनंद

Ganesh Visarjan Miravnuk : परमेश्वराकडून मिळालेले जीवन कसेही असू दे, खचून न जाता संपूर्ण आयुष्याचा आनंद कसा घ्यावयाचा, याचा प्रत्यय श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळाने आणून दिला.

- युनूस शेख

जुने नाशिक : परमेश्वराकडून मिळालेले जीवन कसेही असू दे, खचून न जाता संपूर्ण आयुष्याचा आनंद कसा घ्यावयाचा, याचा प्रत्यय श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळाने आणून दिला. ऐकता, बोलता येत नसतानाही त्यांनी भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या सांकेतिक भाषेचा अर्थात हातवाऱ्यांचा वापर करून मिरवणुकीचा आनंद घेतलाच शिवाय अन्य सहकाऱ्यांनाही व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सांकेतिक भाषेत मिरवणुकीतील क्षणचित्रांची माहिती करून दिली. (deaf and dumb are robbed of joy of procession through video calls )

श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळ गेल्या १२ वर्षांपासून गणेश विसर्जन पारंपरिक मिरवणुकीत सहभाग घेत आहे. तत्पूर्वी त्यांच्याकडून बि.डी. भालेकर मैदान येथे दहा दिवस बाप्पाची स्थापना करून जनजागृतीपर देखावे सादर केले जातात. पाचही ज्ञानेंद्रियांवर प्रभुत्व असणाऱ्यांना लाजवणारे नियोजन त्यांच्याकडून केले जाते. सर्वजण एकत्र येऊन दहा दिवस बाप्पाची सेवा करून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मिरवणुकीचे नियोजनही अतिशय चोख पद्धतीने केले जाते.

स्वतःही मिरवणुकीचा आनंद घेतात आणि घरी असलेल्या आपल्या कुटुंबीयांसह सहकाऱ्यांना घरबसल्या मिरवणुकीचा आनंद अनुभव करून देतात. त्यासाठी त्यांचे माध्यम ठरते ते म्हणजे त्यांची हातवाऱ्यांची सांकेतिक भाषा आणि व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंग. मंगळवारी (ता.१७) निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हे दिसून आले. मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर स्वतःच्या मंडळासह मिरवणुकीतील संपूर्ण मंडळांचे थेट प्रक्षेपण त्यांनी व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना करून दिले. (latest marathi news)

त्यांच्या हातवाऱ्यांच्या सांकेतिक भाषेतून मिरवणुकीतील आनंद व्यक्त केला. प्रत्येक क्षणाची आणि क्षणचित्रांची माहिती आपल्या भाषेत करून दिली. स्मार्ट फोनवरून व्हाट्सअप कॉलिंगच्या माध्यमातून हातवाऱ्यांच्या भाषेतून माहिती समजावून देताना मिरवणुकीत सहभागी अन्य बांधव त्यांच्याकडे पाहून स्तब्ध होऊन जात.

काहीवेळ थांबून ते कशा पद्धतीने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना माहिती देत आहेत, याचा अनुभव घेत होते. काहीजण तर आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून त्यांचे हातवारे बंदिस्त करत होते. पोलिस कर्मचाऱ्यांसह आलेल्या भाविकांमध्ये मूकबधिर बांधव चर्चेचा विषय ठरत होते. तर दुसरीकडे त्यांनी मिळालेले जीवन कसेही असू दे, कुठलीही तक्रार न करता आनंदात आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू या, जणू असा संदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझी अटक बेकायदेशीर'' वाल्मिक कराडचं नेमकं म्हणणं काय? उज्ज्वल निकमांनी गैरसमज दूर केला

Latest Marathi News Live Updates : हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी उपसा करण्यासाठी सातही पंप कार्यान्वित

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवसह ८ खेळाडू ठरले, ७ खेळाडूंवरून घोडे अडले! गौतम गंभीर, अजित आगरकरच्या घोषणेकडे लक्ष

Sarfaraz Khan Century: कसोटी संघातून वगळले, त्या सर्फराजने खणखणीत शतक झळकावून निवड समितीला उत्तर दिले

Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी

SCROLL FOR NEXT