dengue esakal
नाशिक

Nashik Dengue Update : डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट! सिन्नरला तेरा रूग्ण; साथीच्या रुग्णांनी दवाखाने फुल्ल, चिकणगुणियाचीही लागण

Latest Dengue Update News : मागील महिन्यांपासून शहरात डेंग्यू सदृश रूग्ण सापडत असल्याने लहान मुलांमधील तापाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव नागरिकांसह, लहान मुलांमध्येही होताना दिसत आहे. ताप, खोकला, सर्दी अशा आजारांचा फैलाव झाल्याने दवाखाने व क्लिनिकमध्ये लहान मुले व पालकांची गर्दी वाढली आहे. मागील महिन्यांपासून शहरात डेंग्यू सदृश रूग्ण सापडत असल्याने लहान मुलांमधील तापाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. शासकीय यंत्रणेकडे तालुक्यात डेंग्यूचे तेरा रूग्ण आत्तापर्यंत तर दोन चिकनगुणियाचे आढळून आले आहेत. (Dengue Thirteen patients to Sinnar)

सध्या वातावरण बदलामुळे सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक उन्ह असे चित्र आहे. या विषम हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार वाढत आहेत. हे आजार संसर्गजन्य असल्याने त्यांचा लहान मुलांमध्ये लगेचच प्रसार होताना दिसत आहे.

या संसर्गजन्य आजारात ताप सौम्य प्रकारचा असतो. मात्र, तापाकडे वेळेत लक्ष न दिल्यास मुलांमध्ये फ्ल्यू व न्यूमोनियासारखे आजारांचाही धोका उद्भवतो. त्यामुळे कोणताही ताप असेल तर योग्य औषधोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

शहरात डेंग्यूसदृश तापाने अगदी तान्ह्या बालकांपासून ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हा आजार पसरत आहे. या आजारांमध्ये पहिले काही दिवस सांधेदुखी व थकवा, पुरळ येणे यासोबतच तीव्र ताप येणे ही लक्षणे दिसून येतात. लहान मुलांमध्येही लक्षणे दिसत असतील तर तातडीने रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. (latest marathi news)

काय काळजी घ्यावी

- हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत

- बाहेर पडताना मास्क वापरावे

- सोशल डिस्टसिंग पाळावे

- मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत

- लहान मुलांना फ्ल्यूची ल द्यावी

ताप आल्यास काय करावे

- डॉक्टरांच्या सल्ल्याने तापाचे औषध द्यावे

- कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात

- सुती व सैल कपडे घालावेत

- पाणी किंवा द्रव पदार्थ द्यावेत

- वेळोवेळी तापांची नोंद ठेवावी

डेंग्यूला रोखण्यासाठी...

डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळं घरात एसी, फ्रीजखाली साचलेले पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्याकडे विशेष लक्ष ठेवा.

डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळावच. घरांच्या खिडक्यांना जाळी लावणे, शक्यतो दारं-खिडक्या बंद ठेवणे, आणि खूप डास असल्यास त्यांची विल्हेवाट लावायला उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT