NMC Hoarding esakal
नाशिक

NMC News: अधिकाराचे पत्र घेऊन कामगार उपायुक्त महापालिकेत; मराठी पाट्यांसाठी उद्यापासून आस्थापनांवर कारवाई

Nashik News : आता इंग्रजी पाट्यांविरोधात विभागनिहाय कारवाई करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून गुरुवारपासून (ता.७) कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठी पाट्या दुकानांवर न लावणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार महापालिकेचे असताना विविध कर विभागाकडून कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कामगार उपायुक्त विकास माळी हे स्वतः महापालिका मुख्यालयात हजर झाले.

त्यांनी विविध कर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पत्र दिले. त्यामुळे आता इंग्रजी पाट्यांविरोधात विभागनिहाय कारवाई करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून गुरुवारपासून (ता.७) कारवाई होण्याची शक्यता आहे. (nashik NMC Action on establishments for Marathi plates from tomorrow marathi news)

इंग्रजी पाट्यांबरोबरच मराठी पाट्यादेखील लावणे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाच्या अनुषंगाने बंधनकारक केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व महापालिकांना २५ नोव्हेंबर पर्यंतचे मुदत दिली होती. ज्या दुकानांमध्ये मराठी पाट्या लावल्या नसतील तेथे प्रति कामगार दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचेही निर्देश दिले होते.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये जवळपास ६५ हजार दुकाने व आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र दंड आकारणी कोणी करायची या संदर्भात स्पष्टता नव्हती. त्यामुळे महापालिकेने कामगार उपायुक्त कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले. कामगार उपायुक्त कार्यालयाने पंधरा दिवसांतच उत्तर दिले. (Latest Marathi News)

मात्र तीन महिने उलटूनही कामगार उपायुक्त कार्यालयाने पत्राला प्रतिसाद दिला नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. महापालिकेकडून कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कामगार उपायुक्त स्वतः महापालिका मुख्यालयात हजर झाले. कायद्यातील तरतुदी संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टता दिल्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांमार्फत मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

"मराठी पाट्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्या संदर्भात विभागीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून प्रत्येकावर दोन हजार रुपये दंड करण्याच्या सूचना दिल्या आहेत."

- श्रीकांत पवार, विविध कर, उपायुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT