Ancient Hemadpanthi Vaijnath Mahadev Temple here. The magnificent Shiva idol of the Mahadev temple here. esakal
नाशिक

Nashik News : देवघटच्या हेमाडपंथी मंदिरामुळे लौकिकात भर; दहाव्या शतकातील वास्तू

Nashik : नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांच्या त्रिवेणी संगमावर अतिपूर्व माळमाथ्यावर देवघट (ता. मालेगाव) गाव वसलेले आहे.

संदीप पाटील

Nashik News : नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांच्या त्रिवेणी संगमावर अतिपूर्व माळमाथ्यावर देवघट (ता. मालेगाव) गाव वसलेले आहे. येथे दहाव्या शतकातील, स्थापत्य कलेपूर्वी नर्मदेच्या दक्षिणेस असलेल्या शिवभक्त राज्यकर्त्यांनी पुरातन हेमाडपंथी वैजनाथ महादेव मंदिराची स्थापना केली आहे. येथील शिवलिंग स्वयंभू आहे. दगडात कोरलेले एक हजार वर्षांपूर्वीचे शिवालय सुस्थितीत आहे. (Devghat Hemadpanthi temple adds to legend of 10 century architecture )

मंदिराचे प्रवेशद्वार भव्य दोन दगडी खांबांनी उभारले आहे. कमानीवर भव्य घंटा बांधली आहे. शेजारील बाजूला भव्य उंचीचा त्रिशूल आहे. येथील प्रत्येक खांब प्रमाणबद्ध, नक्षीकाम केलेले आहेत. खांबावरील तुळ्या, जोत्रे, चौफुल्या, आयाताकृती नक्षीदार दगडी लाद्यांनी छताची शिल्पकाराकडून निर्मिती केली आहे. मंदिरात भव्य अष्टधातूची घंटा असून, नंदीची मूर्ती आहे. मध्यभागी वैजनाथ महादेवांची शिवलिंगावर स्वयंभू अष्ट धातूंची विलोभनीय सुंदर मूर्ती आहे.

हुताशनी (होळी) पौर्णिमेला सायंकाळी व गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला लिंगाचे चरणस्पर्श करून किरणोत्सव साजरा करतात. एक दरवाजा पश्‍चिममुखी व एक दरवाजा दक्षिणमुखी असे भारतातील एकमेव शिवालय आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास व सांस्कृतिक मंत्रालयाने मंदिर परिसरात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. २५ नोव्हेंबर २०२० रोजी अधिकृत ट्रस्टची स्थापना केली. (latest marathi news)

शासन निधीतून ट्रस्टद्वारे भक्तनिवास, सभामंडप, शौचालय, वाहनतळ, बगीचा, फेव्हर ब्लॉक, घाट आदी निर्मिती केली आहे. ३५० वृक्षारोपण करून जतन केली आहेत. मंदिर परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. दर महाशिवरात्रीला दहा दिवस चालणारा यात्रोत्सव साजरा केला जातो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रोत्सवाला येत असतात. महाशिवरात्री, श्रावणमास, ऋषीपंचमी, हरतालिकेला भाविक प्रचंड गर्दी करतात.

ट्रस्टचे अध्यक्ष किसन गांगुर्डे, साहेबराव जाधव, खगेश जाधव, संदिप देसले, पुरूषोत्तम पगार, निंबाजी जाधव, सुखदेव भामरे, शंकर सोनवणे, संतोष अहिरे, प्रकाश अहिरे, नथुजी देसले आदी विश्‍वस्त मंदिर विकासात नेहमी प्रयत्नशील असतात.

''मंदिर ट्रस्ट, देणगीदार, गावातील ग्रामस्थ, परिसरातील शिवभक्तांच्या सहकार्याने आमूलाग्र कायापालट झाला आहे. पुरातण, जागृत देवस्थान व अफाट श्रद्धेच्या या शिवालय व परिसराचा सर्वांच्या सहकार्याने भविष्यात अजूनही विकास करून देशात नावलौकिक करू.''- किसन गांगुर्डे, संस्थापक अध्यक्ष, श्री क्षेत्र वैजनाथ महादेव मंदिर ट्रस्ट, देवघट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT