Devidas Pingle, Chairman of Nashik Market Committee, speaking at the Annual General Meeting of Shetthi Taluka Sangh held on Sunday in the Sale Hall of Sharad Chandra Pawar Market Yard. esakal
नाशिक

Nashik News : लिंकिंग लिक्विडप्रश्नी कृषिमंत्र्यांबरोबर करणार चर्चा : देवीदास पिंगळे

Latest Nashik News : याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत चर्चा करून शेतकऱ्यांना लिंकिंग लिक्विड घेण्यासाठी वेठीस धरू नये, अशी मागणी करणार असल्याचे माजी खासदार तथा नाशिक बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : शेतकरी व सहकारी संस्थांना खतासोबत लिंकिंग लिक्विड घेण्याचा आग्रह संबंधित कंपन्यांकडून केला जातो. याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत चर्चा करून शेतकऱ्यांना लिंकिंग लिक्विड घेण्यासाठी वेठीस धरू नये, अशी मागणी करणार असल्याचे माजी खासदार तथा नाशिक बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांनी सांगितले. (Linking liquid issue will discussed with Agriculture Minister)

पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील सेल हॉलमध्ये रविवारी (ता. २९) झालेल्या नाशिक शेतकी तालुका संघाच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. व्यवस्थापक संदीप थेटे यांनी मागील आर्थिक वर्षाचे इतिवृत्त वाचले.

संघाचे सभापती दिलीपराव थेटे, उपसभापती दिलीप चव्हाण, सर्व संचालकांसह बाजार समितीचे संचालक संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, उत्तमराव खांडबहाले, संदीप पाटील, माजी संचालक तुकाराम पेखळे, संजय तुंगार, विलास कड, रमेश पिंगळे, राजाराम थेटे, तानाजी पिंगळे, गणेश कहांडळ व शेतकरी उपस्थित होते. (latest marathi news)

श्री. पिंगळे म्हणाले, की शेतकी तालुका संघाने नाशिक तालुक्याच्या चारही बाजूंनी बी-बियाणे, खत डेपो सुरू करून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. संघाच्या एक हजार ७०० संस्थापक सभासदांनी २५ रुपये वर्गणी काढून आपले योगदान देत संस्था उभी केली.

यातील संचालक मंडळाने एक हजार १०० सभासदांना जिवंत केले. निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळला आहे. दीपक हगवणे यांनी प्रास्ताविक केले. शंकरराव पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. बबनराव कांगणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT