Sandeep Benke, Ajay Dubey while felicitating the drivers and carriers of E-Bus on behalf of Saptashringgad Gram Panchayat officials and villagers. esakal
नाशिक

Nashik E-Bus : सप्तशृंगगड ते नाशिक प्रवास झाला गारेगार! ई-बससेवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

E-Bus : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराने सुरु केलेल्या पर्यावरणपूरक वातानुकुलीत ई-बस सेवा सुरु केल्याने भाविकांचा प्रवास आणखी सुखकर व उन्हाच्या चटक्यात गारेगार प्रवास करता येत आहे.

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेेवा

Nashik E-Bus : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराने सुरु केलेल्या पर्यावरणपूरक वातानुकुलीत ई-बस सेवा सुरु केल्याने भाविकांचा प्रवास आणखी सुखकर व उन्हाच्या चटक्यात गारेगार प्रवास करता येत आहे. ई-बसला भाविक व मार्गावरील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. ()

भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर एसटी महामंडळाच्या माध्यमातून १ एप्रिलपासून ईलेक्ट्रीक बस भाविकांच्या सेवेत दाखल झाल्या असून, गडावरील ग्रामस्थांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात पहिल्या बसचे स्वागत करण्यात आले.

सप्तशृंगगडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे यांच्या हस्ते बससमोर नारळ वाढविण्यात आले. तसेच, पहिल्या वातानुकूलित एसटी बसचे चालक दिनेश जायभावे व वाहक ज्योती अरिंगळे यांना श्रीफळ व चुनरी देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी राजू शिंदे, अभिषेक दुबे, मनोज पाठक, हितेश दुबे, इमरान शहा, मोंटी दुबे, नवनाथ आहिरे, सतीश जाधव, तुषार बर्डे, प्रकाश पाटील, निलेश कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(latest marathi news)

आरामदायी बस

पर्यावरणपूरक बस प्रथमच सप्तशृंगी गडावर आल्याने ग्रामस्थांच्या व भाविकांच्या चेहऱ्यावरील कुतूहलमिश्रीत आनंद यावेळी पाहायला मिळाला. यावेळी ‘सप्तशृंगी माते की जय, जय मातादी’च्या घोषणा देण्यात आल्या. वातानुकूलित, आरामदायी ईलेक्ट्रीक बससेवा सुरू झाल्याने भाविकांमध्ये या बसमधून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे.

असे आहे वेळापत्रक

नाशिक जुन्या बसस्थानकावरून (सीबीएस) वातानुकुलीत पहिली ई-बस सकाळी पाच वाजता सुटेल. तर दुसरी बस ५.३० वाजता सुटेल. दोन्ही बस दोन तासानंतर सप्तशृंगगडावर पोहचल्यानंतर अर्ध्या तासानंतर म्हणजेच ७.३० आणि ८ वाजता परतीच्या प्रवासाला निघतील. नाशिक येथे आल्यानंतर बॅटरी चार्ज करुन या दोन्ही बस पुन्हा ११.३० आणि १२ वाजता गडाकडे प्रस्थान करतील.

संध्याकाळी ६ आणि ६.३० वाजता पुन्हा या बस गडाकडे प्रस्थान करतील. बस मध्ये एकूण ३४ प्रवाशी आसन व्यवस्था आहे. लालपरीचे साधारण भाडे १२० रुपये आहे. तर ई-बसचे १७० रुपये आहे. या बस प्रवासामध्ये ५ ते १० वर्षांच्या मुलांना आणि महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत असणार आहे. तर ७५ वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT