नाशिक

गर्दी व्यवस्थापनाचे पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन

CD
पान-२--- फोटो असेल ------------ प्रत्येक पॉइंटवर नागरिकांची कसून तपासणी ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी गर्दी व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ : सिंहस्थ ध्वजारोहणासाठी पोलिस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. प्रत्येक रस्ता बॅरिकेटींगने ठिकठिकाणी बंद केले होते. गोदाघाटावर जाण्याच्या प्रत्येक पॉइंटवर नागरिकांची कसून तपासणी केली जात होती. ध्वजारोहण सोहळा आटोपल्यानंतर नागरिकांच्या परतीच्या मार्गावर समोरून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जात नव्हता. अशा प्रकाराने चेंगराचेंगरीच्या शक्यतेवर मात करीत पोलिसांनी उत्कृष्ट नियोजन केले. .... सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी सुमारे ३५ ते ४० हजार नागरिकांनी गोदाघाटावर उपस्थिती लावली होती. गोदाघाटाच्या दुतर्फा भाविकांची तोबा गर्दी झाली होती. पोलिसांच्या पायी गस्तीपथकांसह प्रत्येक गल्लीत लावलेल्या बॅरिकेटींगजवळ पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. गोदाघाटावर उतरणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी मेटल डिटेक्टर उभारलेले होते. हे पार केल्यानंतरही पोलिसांकडून नागरिकांकडील बॅगेची कसून तपासणी केली जात होती. महिलांच्या पर्सचीही तपासणी महिला पोलिसांकडून केली जात होती. ध्वजारोहण सोहळा आटोपल्यानंतर गोदाघाटावरील नागरिक परतीच्या मार्गाने जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी या परतणाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या नागरिकांना मज्जाव करीत दुसऱ्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दोन्ही दिशांनी येणाऱ्या नागरिकांतून गर्दी होऊन चेंगराचेंगरीची शक्यतेवर पोलिसांना मात करता आली. पोलिसांच्या या दक्षतेची काही जागरूक नागरिकांनी मात्र कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: शेवटचा सामन्यात होणार मोठे प्रयोग? वैभव सूर्यवंशी, कुलदीपला मिळणार Playing XI मध्ये संधी?

Marathi News Live Updates : गोकुळ दूध संघातर्फे उत्पादकांना ११७ कोटींची 'दिवाळी भेट'; अंतिम दूध दर फरक थेट बँक खात्यात जमा

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Foreign Deputy PM daughter Bollywood Ambition : "ते नेते माझ्या मागेच लागलेत!"; जगातील 'त्या' बलाढ्य देशाच्या उपपंतप्रधानांच्या मुलीला काम करायचंय बॉलिवूडमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा खुलासा

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT