Earthquake esakal
नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात मंगळवार (ता. १६) रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान तीन भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून याची व मेरी येथील भूकंप मापक यंत्रात नोंद झाल्याची माहीती तहसलिदार पंकज पवार यांनी देत नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

मंगळवार (ता. १६) रात्री ८. ५८ मीनटांच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी हातनोरे, निळवंडी, उमराळे बुद्रुक, तळेगाव, मडकीजांब, वणारवाडी, वणी, खेडगाव आदी परीसरातील भुकंपाचे धक्के जाणवले. त्यामूळे तालुक्यात काहीशे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार यांनी याबाबत मेरी प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांच्याशी मागितलेल्या माहितीनूसार

मंगळवार (ता.१६) रात्री 08.58 , 09.34 आणि 09.42 वाजता तीन भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत त्याची तीव्रता अनुक्रमे 3.4, 2.1 आणि 1.9 असून नाशिक वेधशाळेच्या पासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता असल्याचा अहवाल दिला आहे. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, व घाबरुन जावू नये असे आवाहन तहसिलदार पंकंज पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg ZP : मार्च २०२६ची डेडलाईन जवळ; सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ कोटी निधीवर ‘काउंटडाउन’ सुरू!

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

तिने ज्या हिमतीने परिस्थिती सांभाळली... विकी कौशलने केलं नवी आई कतरीनाचं कौतुक; म्हणतो- बाळासाठी...

Farmer Protest : कर्जमाफीत पळवाटा शोधू नका; शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला 'न भूतो न भविष्यती' आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्याला फटका,14 हजार 672 हेक्टर वरील रब्बी पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT