Dr. Ulhas Patil & BJP vs Congress esakal
नाशिक

Nashik Political News: नाशिक, दिंडोरी काँग्रेसला मागणारे प्रभारीच भाजपवासी!

प्रभारीही पक्ष सोडून जात असल्याने नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पक्षाकडे खेचण्यासाठी स्थानिक काँग्रेसला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावे म्हणून आग्रही असलेले जिल्ह्याचे प्रभारी माजी खासदार उल्हास पाटील हेच आता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षवासी होत आहेत.

आधीच, काँग्रेसने नाशिकमधील विभागीय बैठक धुळ्यात हलविल्याने नाशिक काँग्रेसला धक्का बसला होता. यातच प्रभारीही पक्ष सोडून जात असल्याने नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पक्षाकडे खेचण्यासाठी स्थानिक काँग्रेसला प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Nashik Dindori in charge of asking Congress joined bjp Divisional meeting in North Maharashtra on January 27 in Dhule nashik political news)

लोकसभा निवडणुकीसाठी फेब्रुवारीत आचारसंहिता लागणार असल्याने भाजपसह काँग्रेसनेही बैठकींचा जोर लावला आहे. इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपासाठी बैठकी सुरू असतानाच काँग्रेसनेही संभाव्य जागांवर लक्ष केंद्रित करीत विभागनिहाय बैठकी सुरू केल्या आहेत.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांतील तयारीसाठी काँग्रेसची २७ जानेवारीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. ही बैठक नाशिकला होणार असल्याची चर्चा होती.

यापूर्वीच्या विभागाच्या आढावा बैठका नाशिकमध्ये झाल्या आहेत. मात्र, यंदाची बैठक ही नाशिकऐवजी धुळे येथे आयोजित केली आहे. त्यामुळे काँग्रेसने धुळे, नंदुरबार, जळगावमधील चार जागांवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले.

त्यावरून काँग्रेसने नाशिक लोकसभेवरील दावा सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जिल्ह्यात प्रभारी म्हणून बैठका घेतलेले काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाने त्यांना निलंबित केले.

काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये बैठका घेऊन नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पक्षाला सोडण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती. केवळ भूमिकाच मांडली नाही, तर प्रदेश काँग्रेसला साकडे घालणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मात्र, डॉ. पाटील यांनीच कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे नाशिक काँग्रेसला हे मतदारसंघ मिळण्याची शक्यता संपुष्टात आली. दुसरीकडे नाशिक काँग्रेसने विभागीय बैठकीची तयारी सुरू केली आहे. बैठकीचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व तालुकाध्यक्षांना निमंत्रण देण्यात आले.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या आठ जागा आहेत. त्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेनेत (ठाकरे गट) जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिक, दिंडोरी आणि अहमदनगरच्या जागा ठाकरे व शरद पवार गटाला हव्या आहेत.

नाशिकमधील जागेवर ठाकरे गटाने, दिंडोरीच्या जागेवर शरद पवार गटाने दावा ठोकला. त्यामुळे काँग्रेसने नमते घेत आपला मोर्चा जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील जागांकडे वळविला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT