sharad pawar
sharad pawar Esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency: शरद पवार यांच्याकडून उमेदवारीचा सस्पेन्स कायम! संभाव्य यादीत उमेदवाराचा समावेश नसल्याने संभ्रम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सात जागा निश्चित झाल्या असून या उमेदवारांची नावे अंतिम झाल्याचे समजते. मात्र, यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव नसल्याने या मतदारसंघातील उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे.

भाजपने येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुन्हा संधी देत रिंगणात उतरविले असल्याने शरद पवार तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहेत. त्यासाठी पवार यांनी स्वतः लक्ष घालत उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. (Nashik Dindori Lok Sabha Constituency Sharad Pawar candidacy Confusion marathi news)

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी राज्यातील काही जागांवर निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

अशातच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महायुती असो की, महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाचा तिढादेखील सुटलेला नाही. मात्र, यातच भाजप, शिवसेना (उबाठा गट), काँग्रेसनेदेखील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली.

यातच, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सात जागा निश्चित झाल्या असून या उमेदवारांची नावे अंतिम झाल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामध्ये बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड, वर्धा या सात जागांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील रावेर व दिंडोरी या लोकसभा मतदासंघातील उमेदवारांची नावे संभाव्य यादीत नसल्याने उमेदवारी कोणास मिळते या चर्चेला उधाण आले आहे.

दिंडोरीतून राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांच्या नावाचा प्रस्ताव स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे पवार यांनी नाशिक दौऱ्यात सांगितले होते. मात्र, नवखा उमेदवार असल्याने डॉ. भारती पवार यांच्या विरोधात त्यांचा कितपत निभाव लागेल याविषयी साशंकता व्यक्त केली जात असल्याने पक्षाकडून तुल्यबळ उमेदवार उतरविण्याबाबत पक्षातंर्गत चाचपणी सुरू आहे.  (latest marathi news)

शरद पवार यांनी या मतदारसंघावर वैयक्तिक लक्ष केंद्रीत केले असून दररोज त्यांच्याकडून राजकीय घडामोडींबाबत आढावा घेतला जात असल्याचे समजते. यासाठी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार खोसकर यांना मुंबईत पाचारण केले होते. आमदार खोसकर व पवार यांच्यात उमेदवारीबाबत चर्चा झाली.

भाजपचे माजी खासदार चव्हाण यांनीही पवार यांची भेट घेतल्यानंतर तेदेखील उमेदवारीसाठी आग्रही झाले आहेत. त्यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह त्यांच्या सर्मथकांनी पवार यांच्याकडे केला आहे. माजी आमदार जे. पी. गावित यांनीसुद्धा या मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे.

त्यांचे पुत्र माजी सभापती इंद्रजीत गावित यांना पक्षाकडून उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दिंडोरीचे माजी आमदार चारोस्कर, सुनिता चारोस्कर तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक माळेकर यांच्या नावाबाबत देखील पक्षात विचारविनिमय सुरू असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT