Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जि. प. कर्मचाऱ्यांची धावपळ

Nashik ZP : दिव्यांग प्रमाणपत्राची जि. प. च्या सभागृहातच खुल्या पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, प्रमाणपत्रासाठी आता कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची जि. प. च्या सभागृहातच खुल्या पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, प्रमाणपत्रासाठी आता कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. आरोग्य, शिक्षण व ग्रामपंचायत विभागात सर्वाधिक दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचे बोलले जात आहे. (nashik Disability Certificate zp Verification in an open manner in zp hall marathi news)

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागांना पत्र काढून पडताळणी करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी तातडीने ही कार्यवाही करण्यास सुरवात केली. यासाठी त्यांनी सर्व विभागांना पत्र दिले. यात २ ऑक्टोबर २०१८ पासून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र हे ऑनलाइन पद्धतीने दिले आहे. या प्रमाणपत्राची पडताळणी ही संकेतस्थळावरून प्रत्यक्षात करावी. (latest marathi news)

संबंधित कर्मचारी यांनी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व संकेतस्थळावरील मूळ प्रमाणपत्र याची समोरा समोर पडताळणी ही थेट जिल्हा परिषदेच्या सभागृहात केली जाणार आहे. त्यासाठी विभागनिहाय नियोजन केले जात आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी २०१८ पूर्वीचे ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेली आहेत.

त्यांना तातडीने ऑनलाइन प्रमाणपत्र काढण्याची किंवा संबंधित प्राधिकरणाकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची सूचना देऊन ही कार्यवाही करण्यात यावी. २०१८ पूर्वीचे ऑफलाइन प्रमाणपत्र ज्या-ज्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेले आहे. त्यांची संवर्गनिहाय यादी तसेच ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतरचा अहवाल विभागप्रमुखांना सादर करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

विभागाकडून कार्यवाही सुरू झाल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रासाठी लगबग सुरू झाली आहे. अनेकांनी शासकीय रूग्णालयात अर्जदेखील केले आहेत. सर्वाधिक प्रमाणपत्र सादर करण्यामध्ये शिक्षक आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रीया सुरू झालेली आहे. त्यापाठोपाठ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्र सादर करण्यामध्ये सर्वाधिक संख्या आहे. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांची संख्याही अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT