Crop Insurance esakal
नाशिक

Crop Insurance : पीककर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँका उदासीन

Nashik News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीककर्ज वाटप करण्याचा रेटा राज्य शासनाकडून लावला जात असताना प्रत्यक्षात राष्ट्रीयीकृत बँकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीककर्ज वाटप करण्याचा रेटा राज्य शासनाकडून लावला जात असताना प्रत्यक्षात राष्ट्रीयीकृत बँकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. १५ जूनपर्यंत जिल्ह्यात झालेल्या पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांचा केवळ ४० टक्के वाटा असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सर्वाधिक ६० टक्के वाटा राहिला आहे. (Disbursement of crop loans to nationalized banks is not interested)

आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांना एक हजार २२२ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. यात जिल्हा बँकेने ३५८ कोटींचे, राष्ट्रीयीकृत बँकांनी ५४५ कोटीचे, तर खासगी बँकांनी ३०६ कोटींचे कर्ज वाटप केले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख बँकांची आढावा बैठक घेतली.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांना तीन हजार २७४ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा बँकेने पुढाकार घेतलेला दिसतो. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या एकट्या जिल्हा बँकेने ३५ हजार ४२७ शेतकऱ्यांना ३५८ कोटींचे पीककर्ज वाटले आहे.

कधीकाळी एक हजार ७०० कोटींवर पीककर्ज वाटणारी जिल्हा बँक आता ६०० कोटींवर आली, तरी राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा बँकेच पीककर्ज वाटपात पुढे असल्याचे दिसून येते. राष्ट्रीयीकृत बँकेने २० हजार ३०१ शेतकऱ्यांना ५४५ कोटी ५३ हजारांचे कर्जवाटप केले; तर खासगी बँकांनी सात हजार ४९६ शेतकऱ्यांना ३०६ कोटी ३७ लाख रुपयांचे वाटप केले. (latest marathi news)

जिल्हा ग्रामीण बँकेने १२ कोटी ३९ लाख रुपयांचे म्हणजे लक्ष्यांकाच्या ९३ टक्के वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बँकनिहाय कर्जवाटप (लाखात)

बँक....................लक्ष्यांक..............वाटप (रु.)

जिल्हा बँक ….....५९,६३६............३५,८०५

राष्ट्रीयीकृत बँक.....२,०६,४००.......५४,५५३

ग्रामीण बँक.......१,३२०...............१,२४०

खासगी बॅंका......६०,११०............३०,७३७

एकूण.....३ हजार २७४ कोटी ६६ हजार....एक हजार २२२ कोटी ३६ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT