At the inauguration of the marathon, BJP leader Dr. A t-shirt with the Congress party symbol worn by Kumbharde. esakal
नाशिक

Nashik News : भाजपा नेत्याच्या अंगी काँग्रेसचा टी-शर्ट! चांदवड तालुक्यातील राजकीय पटलावर खमंग चर्चा

Nashik : पहाटेच्या शपथविधीमधून महाराष्ट्राच्या जनतेला राजकारणातील धक्कातंत्राची झलक दिसली. अशा धक्कातंत्राचा नंतर देशभरात सपाटाच लागला.

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पहाटेच्या शपथविधीमधून महाराष्ट्राच्या जनतेला राजकारणातील धक्कातंत्राची झलक दिसली. अशा धक्कातंत्राचा नंतर देशभरात सपाटाच लागला. परिणाम म्हणून राजकारणात काहीही होऊ शकतं इथपर्यंतची सहजता आता सामान्यांच्या ओठी आली. असाच धक्कादायक पण आता सहजतेच्या मखमली शब्दात सजलेला प्रसंग चांदवड-देवळा विधानसभेच्या पटलावर घडला. ( discussion on political scene in Chandwad taluka )

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपचे जिल्हा नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे काँग्रेसचा ‘हात’ असलेला टी-शर्ट परिधान करून वावरताना दिसल्याने अनेकांचे डोळे विस्फारले. विशेष म्हणजे २०१४ साली राजकीय महत्वकांक्षा बळावल्याने डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी राजकीय गुरु शिरीषकुमार कोतवाल यांचा ‘हात’ सोडला होता. (latest marathi news)

भाजपच्या जिल्हा नेत्याच्या अंगी दिसलेला काँग्रेसचा टी-शर्ट राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. यामुळे भाजपसहित डॉ. कुंभार्डे यांचे काही कार्यकर्ते संभ्रमात पडले असले तरी काही कार्यकर्ते ‘हात पुन्हा हातात घ्या’ असा सूर काढताना दिसले. याबाबत डॉ. कुंभार्डे यांच्याशी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला तेव्हा ही गोष्ट अनवधानाने घडल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, अभ्यासू राजकारणी अशी प्रतिमा असलेल्या नेत्याकडून ऐन विधानसभेच्या तोंडावर अशी घटना घडणे राजकीय साक्षर प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य संदेश देणारी आहे. दुसऱ्या बाजूला ही घटना सहज असली तर ठिक, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकांत दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात राजकीय धक्कातंत्राचा नवा प्रयोग दिसून आल्यास नवल वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT