Kapaleshwar temple esakal
नाशिक

Nashik Kapaleshwar Temple : कपालेश्वरी दानपेटीवरून वाद; भाविकांसमोर पैशावरून दमदाटी, तुफान धुमश्चक्री

Kapaleshwar Temple : संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठच्या सुमारास गुरव परिवारात दानपेटीतल्या पैशावरून दमदाटी, शिवीगाळ व तुफान धुमश्चक्री झाली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठच्या सुमारास गुरव परिवारात दानपेटीतल्या पैशावरून दमदाटी, शिवीगाळ व तुफान धुमश्चक्री झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. या वेळी उपस्थित भाविकांना झालेल्या मनस्तापामुळे या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असे प्रकार येथे यापूर्वीही झाले असून मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांत असंतोष निर्माण झालेला आहे. देशातील भगवान शंकरासमोर नंदी नसलेले एकमेव शिवलिंग म्हणून श्री कपालेश्‍वर महादेव देशभर प्रसिद्ध आहे. (Dispute over Kapaleshwar temple donation boxstorm of smoke in front of devotees over money )

शुक्रवारी गुरव बदलल्यानंतर दानपेटीतले पैशावर हक्क कुणाचा यावरून सकाळी वाद निर्माण झाला व त्याचे पर्यवसान शिवीगाळ आणि जोरदार वादावादीत झाले. पंचवटी पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या वेळी उपस्थित भाविकांनादेखील गुरवांकडून दमदाटी, शिवीगाळ झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. असे प्रकार वारंवार होत असल्याने या जगविख्यात मंदिराची बदनामी होत असून येथे अशांतता निर्माण झाली आहे. काही गुरवांकडून मंदिरात वारंवार वादविवाद व शिवीगाळ असे प्रकार होत असून पोलिस प्रशासनाने या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी आता शिवभक्तांकडून होऊ लागली आहे. लाखो भाविक असलेल्या कपालेश्‍वर महादेव मंदिरात वारंवार होणाऱ्या वादाबाबत हजारो शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. (latest marathi news)

विश्‍वस्त गुरव वादही सर्वश्रृत

मंदिरातील दानपेटीवरून गुरव कुटुंबात वारंवार होणारे वाद सर्वश्रृत आहेत. अशा पवित्र ठिकाणी होणारे वाद पाहून अनेक भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे मंदिराची प्रतिष्ठा कमी होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. याच कारणावरून काही काळापूर्वी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. देवस्थानचे विश्‍वस्त व काही गुरव यांच्यातील वाद सर्वश्रृत असताना आता गुरव कुटुंबातच वाद सुरू झाले आहेत. मात्र आता हा वाद थेट पोलिस दरबारी पोचल्याने पोलिस काय भूमिका घेतात, हेही पाहावे लागेल. विशेष म्हणजे विश्‍वस्तांमधील एक ज्येष्ठ विश्‍वस्त पंचवटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदावर कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

२ वर्ष चांगली चालली अन् वाहिनीने अचानक बंद केली लोकप्रिय मालिका; प्रेक्षक संतापले, म्हणतात- काय मूर्खपणा...

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Nepalese Jhol Momo Recipe: झणझणीत, आंबट आणि शेंगदाण्याच्या चवीचे, नेपाळचे खास झोल मोमो एकदा नक्की ट्राय करा

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT