Nashik District Hospital sakal
नाशिक

Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयात शवागारातील मृतदेह कुजले

अडीच वर्षांपासून एसी बंद, परिसरात दुर्गंधी; आरोग्य धोक्यात

अभिजित सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील शवागाराची एसी यंत्रणा बंद असल्याने शवागारातील मृतदेहांची अवहेलना होतेय. धक्कादायक बाब म्हणजे अनेक मृतदेह इथे ८० ते ९० दिवस पडून असल्यानं ते कुजले असून, परिसरात मोठी दुर्गंधी पसरलीय. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र कागदी घोडे नाचविण्यापलीकडे यंत्रणा काहीच करत नसल्याने मृत्यूनंतरही शवागारातील मृतदेहांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.

उघड्या डोळ्यांनी आपण पाहूसुद्धा शकत नाहीत इतकी विचलित करणारी ही दृश्य आहेत.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील शवागृहाची एसी यंत्रणा दोन-अडीच वर्षांपासून बंद आहे. शवागारातील शवपेट्याही खराब झाल्या आहेत. मात्र तरीही या बंद अवस्थेतील शवागारात मृतदेह ठेवण्यात येत असल्याने या मृतदेहांना अळ्या आणि किडे लागल्यानं ते कुजले आहेत. अक्षरशः काही मृतदेहांचा केवळ हाडांचा सापळाच शिल्लक राहिला असून, इतकी बिकट परिस्थिती होऊनही यंत्रणा याकडे लक्ष देताना दिसत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

शवागारात ४८ शवपेट्या

शवागारात एकूण ४८ शवपेट्या असून, कुलिंगसाठी १२ एसी बसविण्यात आले होते. मात्र सर्व यंत्रणा नादुरुस्त होऊन दोन-अडीच वर्षे लोटली तरी आरोग्य यंत्रणा साधी दुरुस्तीही करत नसल्याने मृत्यूनंतरही अंत्यसंस्काराविना अगदी ८० ते ९० दिवस मृतदेह पडून राहत असल्याने अळ्या आणि किड्यांच्या प्रादुर्भावामुळे विघटन होऊन दुर्गंधी तर पसरत आहेच, मात्र परिसरातील नागरिक आणि रुग्णांचे

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या शहरातच अवहेलना

विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नाशिक शहरातच आरोग्यव्यवस्थेची ही परिस्थिती असेल, तर राज्याच्या ग्रामीण भागात आरोग्यव्यवस्थेचे काय चित्र असेल, याची कल्पनाही करता येऊ शकणार नाही. दर वर्षी आरोग्यव्यवस्थेवर कोट्यवधींचा खर्च होतो, तो नेमका कुठे मुरतो? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मागील अडीच वर्षांपासून संपूर्ण एसी कुलिंग यंत्रणा व शवपेट्या पूर्णपणे खराब आहेत. त्या दुरुस्त होऊ शकत नाही. ही स्थिती पाहता नवीन यंत्रणा बसविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तोपर्यंत मृतदेह जास्त काळ शवागारात राहणार नाही, यासाठी पाठपुरावा करू.

- डॉ. उत्कर्ष दुधाडिया, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT