Funds Expenditure
Funds Expenditure esakal
नाशिक

Nashik News : निधी खर्चात विभागामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यंदाच्या आर्थिक वर्षाचा शुक्रवार (ता.३१) अखेरचा दिवस असून जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चात उत्तर महाराष्ट्रात नाशिक आघाडीवर आहे. पाठोपाठ नंदुरबार जिल्हा आहे, त्यामुळे अखेरच्या दिवशी कोणता जिल्हा काय करामत करतो याकडे प्रशासनाचे लक्ष लागून आहे. (Nashik district leading in fund expenditure department Nashik News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

नाशिक जिल्हा निधी खर्चात राज्यात चौथ्या स्‍थानी तर उत्तर महाराष्ट्रात पहिल्या स्‍थानी आहे. मागील आर्थिक वर्षात आमदारांमधील राजकारणामुळे निधी खर्चात राज्यात पिछाडीवर असलेल्या उत्तर महाराष्ट्रात यंदा मात्र निधी खर्चाकडे लक्ष दिले जात आहे.

जळगाव व नगर जिल्हे मात्र अजून पिछाडीवर आहेत. निधी खर्चाच्या आकडेवारीत आज गुरुवारी (ता.३०) दुपारपर्यंत नंदुरबार १५, धुळे १८, नगर २२ आणि जळगाव २५ व्या स्थानी आहे. अखर्चित निधी पुन्हा परत जाऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेवर दबाव असल्याने आज सुट्टीच्या दिवशी निधी खर्चासाठी बैठका तसेच, कामाचा जोर होता.

दुपारपर्यंतच्या आकडेवारीत नाशिक जिल्ह्यात ९६ टक्के इतका निधी खर्च झाला होता. जेमतेम चार ते पाच टक्के निधी खर्चाचे नाशिक जिल्ह्यापुढे आव्हान होते. दुपारनंतरही आकडेवारी वाढत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT