RTE1.jpg 
नाशिक

आरटीई प्रवेशात राज्‍यात 'या' जिल्ह्याची आघाडी..दोन हजार प्रवेश झालेला एकमेव जिल्‍हा 

अरुण मलाणी

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्‍के राखीव जागांच्‍या मोफत प्रवेशासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आर्थिक दुर्बल घटकांना या राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जात असतो. पहिल्‍या टप्‍यातील प्रक्रियेत राज्‍यात सर्वाधिक प्रवेश नाशिक जिल्‍ह्‍यात निश्‍चित झालेले आहेत. आतापर्यंत २ हजार १३६ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्‍चिती झालेली आहे. त्‍यापाठोपाठ नगर जिल्‍ह्‍यात सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. 

आरटीई प्रवेशात राज्‍यामध्ये नाशिक जिल्‍हा अव्वल
कोरोना प्रादुर्भावाच्‍या परीस्‍थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या विविध शिक्षणक्रमांची प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. आरटीईअंतर्गत पंचवीस टक्‍के जागांवरील प्रवेशप्रक्रियेवरही परीणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे शाळा पूर्णपणे ठप्प असल्‍याने ऑनलाइन सोडत जाहीर झाल्‍यानंतरही प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया राबविता आली नसती. परंतु परीस्‍थिती पूर्वपदावर येत असतांना, आता प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. राज्‍यस्‍तरावर प्रवेश निश्‍चितीच्‍या बाबतीत नाशिक जिल्‍हा आघाडीवर असून, दोन हजार प्रवेश झालेला एकमेव जिल्‍हा आहे. 


अशी आहे राज्‍याची, जिल्‍ह्‍याची स्‍थिती 
राज्‍यातील ९ हजार ३३१ खासगी शाळांतील १ लाख १५ हजार ४४९ जागांवर मोफत प्रवेश दिले जात आहेत. त्‍यासाठी २ लाख ९१ हजार ३६८ अर्ज ऑनलाइन स्‍वरूपात प्राप्त झाले होते. ऑनलाइन सोडतीत ४० हजार ६२३ विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्‍यापैकी मंगळवारी (ता.२८) दुपारपर्यंत १६ हजार ७०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले होते. नाशिक जिल्‍ह्‍याचा विचार केल्‍यास ४४७ शाळांमध्ये प्रवेशासाठी ५ हजार ५५७ जागा उपलब्‍ध आहेत. तर तब्‍बल १७ हजार ६३० विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीत ५ हजार ३०७ विद्यार्थ्यांच्‍या नावाचा समावेश होता. यापैकी २ हजार ४६९ प्रारूप स्‍वरूपात प्रवेश नोंदविला असला तरी प्रत्‍यक्षात २ हजार १३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. 

अन्‍य जिल्‍ह्‍यांची स्‍थिती अशी- 
जिल्‍हा प्रवेश निश्‍चिती 

नाशिक २ हजार १३६ 
नगर १ हजार ५६२ 
बुलढाणा १ हजार १४२ 
जळगाव १ हजार ०७५ 
पुणे ९१०

रिपोर्ट - अरूण मलाणी

संपादन - ज्योती देवरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT