Officials with District Magistrate Jalaj Sharma during an inspection of Palkhed Dam, Left Canal on Wednesday. esakal
नाशिक

Nashik News : अनधिकृत पाणीउपसा केल्यास कारवाई : जिल्‍हाधिकारी शर्मा

Nashik : पालखेड डाव्‍या कालव्‍याचे बिगरसिंचन आवर्तन मंगळवारी (ता. २६) सोडण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पालखेड डाव्‍या कालव्‍याचे बिगरसिंचन आवर्तन मंगळवारी (ता. २६) सोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्‍हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी (ता. २७) पालखेड धरण आणि पालखेड डाव्‍या कालव्‍यास भेट देत पाहणी केली. आवर्तनादरम्यान अनधिकृत पाणीउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले आहेत. (nashik District Magistrate Sharma statement of Action against unauthorized water withdrawal marathi news)

पालखेड पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अ. बा. रौंदळ यांनी ही माहिती दिली. पालखेड डाव्या कालव्याद्वारे व कादवा नदीद्वारे दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यांतील गावांना पिण्यासाठी आरक्षित केलेले आकस्मिक आरक्षणाचे पाणी देण्यासाठी आवर्तन सोडले आहे.

मनमाड व येवला परिषद, येवला तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड आणि ग्रामपंचायत, आंबेगाव या शासनमान्य पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा करण्यासाठी ९ एप्रिलपर्यंतच्‍या कालावधीत पालखेड डाव्या कालव्याचे बिगरसिंचन आवर्तन सोडण्यात येत आहे. (latest marathi news)

बुधवारी भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या समवेत कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपअभियंता प्रशांत गोवर्धने यांच्यासह महसूल, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व पोलिस अधिकारी उपस्थित होते. आवर्तनादरम्यान पोलिस बंदोबस्त चोख ठेवावा, कालव्यालगतच्या मोटारींचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करावा, तसेच आवर्तनादरम्यान अनधिकृत पाणीउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्‍हाधिकारी यांच्या सूचना

- आवर्तन कालावधीत कालव्यालगतचा वीजपुरवठा खंडित करा

- पोलिस बंदोबस्त, राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी उपलब्ध करणार

- बंधाऱ्यांवरील अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्‍या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT