panchayat development index esakal
नाशिक

Nashik News : पंचायत विकास निर्देशांक संकलनात नाशिक जिल्हा अव्वल! माहितीची 100 टक्के पडताळणी करून माहिती शासनाला सादर

Nashik News : पंचायत विकास निर्देशांक करण्यात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावरून विभागनिहाय सर्व माहिती भरली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार पंचायत विकास निर्देशांक तयार करण्यात येत आहे. या पंचायत विकास निर्देशांक करण्यात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावरून विभागनिहाय सर्व माहिती भरली असून, त्यांची पडताळणी तालुका व जिल्हास्तरावरून १०० टक्के झाली आहे. (Nashik district top in panchayat development index collection)

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांनी यात चांगली कामगिरी नोंदविली आहे. ‘पंचायत विकास निर्देशांक समिती’ या नावाने स्थापित तज्ज्ञ गटाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पंचायत विकास निर्देशांक नावाने संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर २०२३-२४ या आर्थिक वर्षातील आधारभूत माहिती ऑनलाइन भरण्याचे आदेश दिले होते.

‘पीडीआय’च्या अहवाल आणि गणनेसाठी दर्जेदार माहिती, हा पाया असणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कृषी विभाग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, बँका, शिक्षण विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, गृह विभाग, अन्न व नागरीपुरवठा विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग.

राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियान (एनआरएलएम) विभाग, महिला व बालकल्याण विभाग अशा १५ क्षेत्रीय विभागांनी सक्रिय सहभाग घेणे महत्त्वपूर्ण आहे. त्याबाबत संबंधित विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना माहिती संकलन, प्रमाणिकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागनिहाय माहिती संकलन प्रमाणित करून ग्रामपंचायतनिहाय माहिती संकेतस्थळावर भरण्यात आली. (latest marathi news)

सर्व विभागनिहाय अधिकाऱ्यांनी माहितीची पडताळणी करत ही माहिती योग्य असल्याचे गटविकास अधिकारी यांना कळविले. गटविकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेली जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे प्राप्त झाली. ग्रामपंचायतीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी सदर माहिती पडताळणी करत ही माहिती राज्य शासनाला सादर केली.

राज्यात नाशिक जिल्ह्यानेच १०० टक्के ही माहिती आतापर्यंत सादर केलेली आहे. इतर जिल्हे यात मागे दिसत आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन ग्रामपंचायतींकडून पाठपुरावा करून हे काम केल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडोळ यांनी सांगितले.

पायाभूत माहिती म्हणून वापर

चालू आर्थिक वर्षातील पंचायत विकास निर्देशांक २०२२-२३ मधील माहितीच्या आधारावर तयार करण्यात येणार आहे. पंचायत विकास निर्देशांकमधील माहिती ही पंचायतीच्या विकासाची सद्यःस्थिती दर्शविणारी निर्देशक म्हणून काम करणार आहे. ग्रामपंचायतीच्या शाश्वत विकास स्थानिकीकरणासंदर्भातील २०२३-२४ मध्ये तयार होणारा पंचायत विकास निर्देशांक हा बेसलाइन इन्फॉर्मेशन म्हणजेच पायाभूत माहिती म्हणून वापरला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: केशर १२०, दशहरी १००, कर्नाटकी हापूस १५० रुपये किलो;परभणीच्या फळबाजारात आंब्याच्या दरात घसरण; सर्वसामान्यांना दिलासा

नेस्को प्रकरणातील आरोपी विद्यार्थ्यांच्या कोठडीत वाढ, एक्स्टॅसी पुरवणाऱ्या मुख्य आरोपीसमोर होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : मुरबाड माळशेज महामार्गावर भीषण अपघात

Gokul Dudh Sangh Politics : 'गोकुळ'वर प्रशासक राज किती काळ? 63 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ, काय सांगतो नियम?

Palghar Minor Assault Case : पालघर हादरलं! पोलिस ठाण्याच्या हद्दीत 13 वर्षांच्या चिमुकलीवर 55 वर्षीय भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार; स्मशानभूमीत नेऊन केलं काळं कृत्य

SCROLL FOR NEXT