Speaking at the state level conference of the Communist Party of India, Dr. Bhalchandra Kongo. Along with various office bearers of the party. esakal
नाशिक

Nashik News : आरक्षण वाढीसाठी ‘भाकप’च्या जिल्हानिहाय परिषदा; महिनाभर मोहिम

Nashik : आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर वाढवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे येत्या ऑगस्टच्या पहिल्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय परिषदा घेण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर वाढवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे येत्या ऑगस्टच्या पहिल्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय परिषदा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर १६ ते २९ ऑगस्टदरम्यान गाव पातळीवर जनजागृती करुन ३० तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय ‘भाकप’ने राष्ट्रीय मेळाव्यातून घेतला आहे. (District wise councils of CPI campaign for month for increase in reservation )

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिल सदस्यांचे तीन दिवसीय अधिवेशनात बुधवारी (ता.२३) पासून नाशिक शहरातील राणे नगर येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यालयात सुरु आहे. भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो, राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, सहसचिव डॉ.राम बाहेती, सह सचिव राजू देसले, तुकाराम भस्मे, नामदेव चव्हाण, स्मिता पानसरे, शिवकुमार गणवीर, प्रकाश रेड्डी, सुकुमार दामले, राजन क्षिरसागर, श्याम काळे हे अधिवेशनात सहभागी आहेत.

बैठकीत डॉ.कांगो यांनी पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरील अहवाल सादर केला. केंद्र सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा भांडवलदार धार्जिणा असल्याची टिका डॉ. भालचंद्र कांगो यांनी केली. महाराष्ट्रातील सध्याच्या जातीय ध्रुवीकरणाच्या वातावरणात जनतेचे मूलभूत प्रश्न मागे पडत आहेत. (latest marathi news)

त्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या जमीन, पाणी, वीज, रेशन, पेन्शन, शिक्षण, आरोग्य, सामुदायिक आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, किमान वेतन, सेवा सुरक्षा, घरकुल, भूमिहीनांना जमीन, निराधार लोकांना अनुदान या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी, सरकारला धारेवर धरण्यासाठी ‘भाकप’च्यावतीने १६ ते २९ ऑगस्ट २०२४ दरम्यान राज्यव्यापी मोहीम राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यामध्ये शाखावार, तालुकावार बैठका, मेळावे, निदर्शने, धरणे, पत्रकाचे वाटप, जत्थे, चर्चासत्र या माध्यमातून सतत १५ दिवस विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व जनजागरण करण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. १६ ते २९ ऑगस्टपर्यंतची मोहीम झाल्यानंतर ३० ऑगस्टला राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

जातनिहाय जनगणना परिषद कोल्हापूरला

जिल्हानिहाय परिषदा झाल्यानंतर शाहू महाराजांच्या कोल्हापूर या कर्मभूमीत राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषद ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा करून, कोणकोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची आणि त्याबाबतची दिशा यावर चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT